AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आले पीक पक्वतेच्या अवस्थेत आहे? मग असे करा व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
आले पीक पक्वतेच्या अवस्थेत आहे? मग असे करा व्यवस्थापन!
👉 आल्याची रुंद वरंबा (गादी वाफा) पद्धतीने लागवड असल्यास ठिबक सिंचनाचा उपयोग करावा. 👉 जमिनीतील ओलाव्यानुसार ठिबक संच चालू ठेवावा. सतत पाणी सोडू नये. 👉 सतत ओलावा राहिल्यास कंद कुजतात. त्यामुळे कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव होते. 👉 पावसाळ्यानंतर हिवाळ्यामध्ये पाण्याच्या दोन पाळ्यातील अंतर १२ ते १५ दिवस ठेवावे. 👉 आठ महिने होईपर्यंत जमिनीच्या मगदुराप्रमाणे आले पिकास पाणी देत रहावे. 👉 कंद पोसण्याच्या कालावधीमध्ये आल्याला पाण्याची गरज मर्यादित असते. 👉 आले काढावयाचे असल्यास पिकास पाणी कमी करत जाऊन आठ महिने पूर्ण झाल्यानंतर पाणी पूर्णपणे बंद करावे. पाणी एकदम बंद केल्यास आल्याला परत अंकुर फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे वजनात घट येते. 👉 आल्याचे कंद चांगले पोसण्यासाठी आठ महिन्यांपर्यंत ०-०-५० हे खत ठिबकमधून सुरू ठेवावे. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
4
1
इतर लेख