गुरु ज्ञानAgroStar
आले पिकाच्या लागवडीचे संपूर्ण नियोजन!
🌱सुरुवातीच्या काळात आले आणि हळद पिकाच्या जोमदार वाढीसाठी योग्य पद्धतीने बेड वर लागवड करून खतांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. यासाठी 1 मीटर रुंदी व 25 ते 30 सेंमी उंचीचा गादीवाफा तयार करून बेड वर 30*30 सेंमी अंतरावर दोन किंवा तीन ओळींमध्ये प्रक्रिया केलेल्या कंदांची लागवड करावी. तसेच लागवडीपूर्वी बेड मध्ये चांगले कुजलेले मुबलक शेणखत, निंबोळी पेंड 200 किलो, युरिया 50 किलो, सुपर फॉस्फेट 200 किलो, पोटॅश 50 किलो व सूक्ष्म अन्नद्रव्ये 10 किलो सोबतच पिकातील पिवळेपणा कमी करण्यासाठी सल्फर 3 किलो आणि किडींच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी क्लोराँट्रानिलिप्रोल 0.4% जीआर घटक असणारे रॅपिजन जीआर 4 किलो प्रति एकरी द्यावे.
🌱संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.