AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आले पिकाच्या लागवडीचे अंतर आणि सुरुवातीचे अन्नद्रव्ये व्यवस्थापन
गुरु ज्ञानAgroStar
आले पिकाच्या लागवडीचे अंतर आणि सुरुवातीचे अन्नद्रव्ये व्यवस्थापन
👉आले आणि हळद पिकाच्या सुरुवातीच्या वाढीसाठी परिपूर्ण बेड लागवड व खत व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. सुरुवातीच्या काळात जर योग्य पद्धतीने लागवड केली आणि योग्य खत व्यवस्थापन झाले, तर पिक जोमाने वाढतो व उत्पादनात वाढ होते. 👉यासाठी गादीवाफा तयार करताना 1 मीटर रुंद व 25 ते 30 सेंमी उंच बेड तयार करावा. या बेडवर 30x30 सेंमी अंतरावर दोन किंवा तीन ओळींमध्ये प्रक्रिया केलेल्या कंदांची लागवड करावी. यामुळे झाडांची मुळे मोकळ्या जागेत पोसतात आणि वाढ उत्तम होते. 👉लागवडीपूर्वी खालील प्रमाणे खतांचे व्यवस्थापन करावे: संचार 25 किलो, भूमिका 4 किलो, निंबोळी पेंड 200 किलो, युरिया 50 किलो, सुपर फॉस्फेट 200 किलो, पोटॅश 50 किलो, सूक्ष्म अन्नद्रव्ये 10 किलो, सल्फर मॅक्स 6 किलो (पिकातील पिवळेपणा कमी करण्यासाठी), आणि एलिऑस 2.5 किलो प्रति एकर (किडींच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी) बेडमध्ये मिसळावे. 👉ही पद्धत अवलंबल्यास सुरुवातीपासूनच पिकाचे आरोग्य सुधारते आणि उत्पादनात वाढ होते. 👉संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
0
1