AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आले पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आले पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
आले पिकाच्या जोमदार वाढ, फुटवे व कंदाच्या वाढीसाठी योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन करणे आवश्यक असते. पिकाला आपण फोकून, ठिबक अथवा फवारणीतून अन्नद्रव्ये पुरवठा करत असतो. तर पिकाच्या अवस्थेनुसार फवारणीतून कोण कोणती अन्नद्रव्ये देणे आवश्यक आहे हे खाली सांगितले आहे. लागवडीनंतर ४०-४५ दिवसांनी चिलेटेड फेरस @१ ग्रॅम + चिलेटेड सुक्ष्म अन्नद्रव्ये @१ ग्रॅम प्रती लिटर पाण्यातून फवारणी करावी. लागवडीनंतर ४ महिन्यांनी ००:५२:३४ @५ ग्रॅम + चिलेटेड सुक्ष्म अन्नद्रव्ये @१ ग्रॅम प्रती लिटर पाण्यातून फवारणी करावी. लागवडीनंतर ६ महिन्यांनी २-३ वेळेस ००:५२:३४ @५ ग्रॅम + बोरॉन @१ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. लागवडीनंतर ८ महिन्यांनी ००:००:५० @५ ग्रॅम + चिलेटेड कॅल्शियम @१ ग्रॅम प्रती लिटर पाण्यातून फवारणी करावी.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
60
21
इतर लेख