अॅग्री डॉक्टर सल्लासकाळ
आले पिकाची काढणी करतेवेळी हे करा!
आले पिकाची काढणी पूर्वी आठ महिने पूर्ण झाल्यानंतर या पिकाचे पाणी कमी करत जाऊन नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर पाणी बंद करावे. ७० ते ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाने सुकल्यानंतर पाला कापून काढावा. त्यासाठी पेट्रोलचलित "ब्रश कटर'चा वापर करावा. अन्यथा तो गोळा करावा. पाला कापल्यानंतर हलकेसे पाणी देऊन आल्याची काढणी करावी. गादीवाफ्यावर लागवड असल्यास ट्रॅक्‍टरचलित यंत्राद्वारे आले काढणी करता येते. यामुळे इंधन, वेळ आणि मजूर यांची बचत होते. आल्याची काढणी केल्यानंतर त्यास चिकटलेली माती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी आणि आले सावलीत सुकवावे. संदर्भ:- सकाळ, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
20
2
इतर लेख