AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आले (आद्रक) पिकामध्ये कंद कूज/सड समस्या आहे का?
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आले (आद्रक) पिकामध्ये कंद कूज/सड समस्या आहे का?
आल्याचे कंद नासणे हा रोग बुरशीजन्य असून बुरशीची बीजे जमिनीत राहतात व वाढतात. हा रोग प्रामुख्याने १. बुरशी पिथियम व फ्युजॅरियम, २. सुत्रकृमी, किंवा ३. कंदमाशी यांच्यामुळे होतो. कधी कधी प्रतिकुल परिस्थितीत वरील रोगांची कारणे जमिनीत किंवा बेण्यात सुप्तावस्थेत राहतात. या रोगात पानांचे शेंडे वरून व कडेने पिवळी पडून खालपर्यंत वाळत जातात. खोडांचा जमिनीलगतचा बुंधा काळपट राखाडी रंगाचा होतो. गड्डा व हळकुंडे काळी व निस्तेज पडतात. हाताने दाबल्यास त्यातून घाण पाणी बाहेर येते. झाडाचे खोड थोड्याशा झटक्याने चटकन हातात येते. नियंत्रण- 👉 याचे नियंत्रणासाठी लागवडीचे बेणे निरोगी वापरणे आवश्यक असते. 👉 जमिनीच्या प्रकारानुसार योग्य प्रमाणात पाणी द्यावे. पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. 👉 याच्या नियंत्रणासाठी सुडोमोनास @१ किलो आणि ट्रायकोडर्मा व्हिरीडी @१ किलो प्रति एकरी जमिनीद्वारे किंवा ठिबक उपलब्ध असल्यास ठिबकद्वारे द्यावे. तसेच रासायनिक पद्धतीच्या नियंत्रणासाठी शिफारशीनुसार कीटक व बुरशीनाशके वापरावीत. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा."
23
7
इतर लेख