AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
‘आयुष्यमान भारत’ साठी होणार मोफत नोंदणी!
समाचारAgrostar
‘आयुष्यमान भारत’ साठी होणार मोफत नोंदणी!
👉🏻केंद्राच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘विकसित भारत यात्रा’ सुरु करण्यात आली आहे.यानिमित्ताने विविध योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावयाचे आहेत. जिल्ह्यात आयुष्यमान भारत ही आरोग्य सुविधा पुरविणारी योजना आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोफत नोंदणी, केवायसी सुविधा उपोलब्ध आहे. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहनही करण्यात आले आहे. 👉🏻प्रधानमंत्री आयुष्मान भारत या योजनेद्वारे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा दिला जातो. योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना पॅनेलीकृत रुग्णालयांद्वारे 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य उपचार दिले जातात. 👉🏻देशातील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी ही ही योजना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 सप्टेंबर 2018 रोजी सुरू केली होती. देशातील 40 कोटींहून अधिक नागरिकांना या योजनेत समाविष्ट करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. 👉🏻आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी अर्ज करू शकतात. ही योजना कार्यान्वित झाल्याने देशातील एकही नागरिक आर्थिक अडचणींमुळे उपचारापासून वंचित राहणार नाही. या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी क्लिक करा ::https://www.maharashtra.gov.in/ 👉🏻संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
1
इतर लेख