AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आयुर्वेदिक लिंबूला मिळतोय अधिक भाव!
सल्लागार लेखसकाळ
आयुर्वेदिक लिंबूला मिळतोय अधिक भाव!
फळबागा आणि भाजीपाला शेतीत काळगाव (ता. साक्री) येथील अनेक शेतकरी यशस्वी झाले आहेत. कोरोना काळात आयुर्वेदिक औषध ठरणारा लिंबू सध्या भाव खात आहे. कडक उन्हाळ्यात लिंबूची मागणी अधिक असल्याने काळगाव येथील युवा शेतकऱ्याची एक एकर क्षेत्रातील लिंबू शेती सध्या फायद्याची ठरत आहे. ➡️ काळगाव (ता. साक्री) हे गाव भाजीपाला, फळपिकाविषयी अग्रेसर मानले जाते. किंबहूना तेथील जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला छेद दिला आहे. एकेकाळी डाळिंब, सीताफळ, द्राक्षे, शेवगा, टोमॅटो यांसारख्या पिकांनी अनेक बाजारपेठांत गावाच्या नावाचा डंका वाजवला आहे. आज काळगाव येथील युवा शेतकरी नितीन ठाकरे यांनी डाळिंब, शेवग्याबरोबरच लिंबू शेतीवर लक्ष केंद्रित केले आहे. एक एकर क्षेत्रात लिंबू लागवड करत ‘कोशीश करनेवाले की हार नहीं होती’ हे दाखवून दिले आहे. अगदी कमी खर्चात हे पीक घेतले जात असून, अपवाद वगळता कीटकनाशकाची फवारणी केल्याचे ठाकरे कुटुंब सांगते. माल विकण्याचाही प्रश्‍न ➡️ गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या महामारीमुळे प्रत्येक व्यवसायाला घरघर लागली आहे. त्यास शेतीव्यवसाय अपवाद असला तरी पिकवून विकता येत नसल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या वाढत्या ससंर्गामुळे शासनाने लॉकडाउन, संचारबंदी लावल्यामुळे अनेक दिवस बाजार समित्या बंद ठेवल्याने कष्टाने पिकवलेला शेतमाल कुठे विकावा, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. किमान चार लाखांचे उत्पन्न अपेक्षित ➡️ शेतीव्यवसाय परवडत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड रास्त असली तरी अलीकडच्या काळात वेगवेगळे प्रयोग करण्याची गरज असल्याचे श्री. ठाकरे यांनी सांगितले. प्रत्येक हंगामात ज्यास मागणी असेल तशाच पिकाची लागवड करणे गरजेचे आहे. प्रामुख्याने उन्हाळ्यात लिंबाला मोठी मागणी असते. शिवाय आयुर्वेदिक महत्त्व व सध्या कोरोना आजारावर ते उपयुक्त असल्याने मागणी आहे. किंबहूना आहारात अतिआवश्यक घटक असल्याचे वैद्यकीय सूत्रे सांगतात. एक एकर क्षेत्रात सुमारे दोनशे लिंबूची झाडे आहेत. स्थानिक ठिकाणासह मालेगाव, धुळे व साक्री बाजारपेठेत विक्री होत असली तरी साठ ते सत्तर रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. एकरभर क्षेत्रात चार लाखांचे उत्पन्न अपेक्षित असल्याची माहिती श्री. ठाकरे यांनी दिली. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- सकाळ, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
3