AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आयडीबीआय बँकेत 920 जागांसाठी भरती!
नोकरीNews 18 lokmat
आयडीबीआय बँकेत 920 जागांसाठी भरती!
➡️ आयडीबीआय बँकेने 2021 मधील भरती प्रक्रिया सुरू केली आहे. बँकेने विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. आयडीबीआय बँक कार्यकारी पदांवर कंत्राटी पद्धतीने पात्र उमेदवारांची देशभरातील विविध शाखांमध्ये नेमणूक करणार आहे. कार्यकारी पदासाठी अर्ज करण्याची सुरुवात 4 ऑगस्ट पासून झाली असून अखेरचा दिवस 18 ऑगस्ट आहे. 920 पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. एक वर्षाच्या करारावर नेमणूक पात्र उमेदवार आयडीबीआय बँकेचा अधिकृत वेबसाईट idbibank.in वर जाऊन अर्ज दाखल करू शकतात. बँक कार्यकारी पदावरील उमेदवारांची नियुक्ती फक्त एका वर्षासाठी करण्यात येणार आहे. उमेदवारांच्या कामगिरीवर त्यांचा कार्यकाळ पुढील दोन वर्षापर्यंत वाढवला जाऊ शकतो. पदांचा तपशील आयडीबीआय बँकेने 920 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. वयोमर्यादा उमेदवारांचे वय 20 ते 25 च्या दरम्यान असावं, असं बँकेतर्फे जारी केलेल्या नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलं आहे. शैक्षणिक पात्रता अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांनी भारत सरकारने मान्यता दिलेल्या कोणत्याही विद्यापीठातून 55 टक्केंनी पदवी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. तर, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी 50 टक्क्यांची अट निश्चित करण्यात आली आहे. अर्जाचं शुल्क अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग उमेदवारासाठी अर्जाचे शुल्क 200 रुपये आहे, इतर प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क 1000 रुपये भरावे लागणार आहे. पगार किती? आयडीबीआयच्या कार्यकारी पदासाठी देशभरातील विविध परीक्षा केंद्रावर 5 सप्टेंबरला परीक्षा आयोजित केली जाणार आहे. तर, निवड झालेल्या उमेदवारांना पहिल्या वर्षी 29 हजार रुपये, दुसऱ्या वर्षी 31 हजार तर तिसऱ्या वर्षी 34 हजार रुपये मानधन दिलं जाणार आहे. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- न्युज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
35
19