AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आयएमडी (भारतीय हवामानशास्त्र विभाग) कडून 13 राज्य व 2 केंद्र शासित प्रदेशांकरिता वीजगर्जनेसह वादळाचा इशारा देण्यात आला आहे.
कृषि वार्ताबिझनेस स्टॅंडर्ड
आयएमडी (भारतीय हवामानशास्त्र विभाग) कडून 13 राज्य व 2 केंद्र शासित प्रदेशांकरिता वीजगर्जनेसह वादळाचा इशारा देण्यात आला आहे.
सोमवारी आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथील विविध ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी देशभरातील 13 राज्यांमधे आणि दोन केंद्र शासित प्रदेशात वीजगर्जनेसह तुफानी वादळाबरोबर मुसळधार पाऊस आणि गारा पडण्याची शक्यता आहे, असे गृह मंत्रालयाने म्ह्टले आहे. सोमवारी जम्मु काश्मीर व हिमाचल प्रदेशातील विविध ठिकाणी वीजगर्जनेसह वादळाची आणि गारा पडण्याची बहुतेक शक्यता आहे तसेच उत्तराखंड व पंजाब मधील विविध ठिकाणी वीजगर्जनेसह वादळी वारे वाहण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
सोमवारी आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथील विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असे गृह मंत्रलयाच्या अधिकाऱ्याने भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) सल्ल्यानुसार रविवारी म्हटले आहे. जम्मु काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदिगढ, दिल्लीसाह पश्चिम उत्तर प्रदेशातील विविध ठिकाणी वीजगर्जनेसह वादळाबरोबर वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम राजस्थानातील विविध ठिकाणी धुळीच्या वादळाची आणि वीजगर्जनेसह वादळाची शक्यता असल्याचे ही अधिकाऱ्याने म्हटले आहे. मागील आठवड्यात पाच राज्यांमधे झालेल्या धुळीच्या वादळामुळे, वीजगर्जनेसह आलेल्या वादळामुळे आणि वीज पडण्यामुळे आतापर्यंत 124 व्यक्ति मरण पावल्या आहेत, व 300 पेक्षा अधिक माणसे जखमी झाली आहेत. संदर्भ - बिझनेस स्टॅंडर्ड
14
0