AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आपल्या मिरची पिकात चुरडा-मुरडा दिसतोय?
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आपल्या मिरची पिकात चुरडा-मुरडा दिसतोय?
मिरची पिकात फुलकिडी (थ्रिप्स) चा प्रादुर्भाव असल्यास हि कीड पानांना खरवडून पानातील रसशोषण करते त्यामुळे झाडाची पाने आकाशाच्या दिशेने होडी सारखी वळून आकसल्यासारखी दिसतात. यामुळे पिकाच्या प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळा येऊन फुलांची व फळांची गुणवत्ता खालावली जाते. 👉 यावर उपाययोजना म्हणून सुरुवातीला मिरची पिकात थ्रिप्स कीडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकात निळे चिकट सापळे एकरी ५ ते १० लावावे व फवारणीसाठी स्पिनोसॅड ४५% एससी घटक असलेले कीटकनाशक @७५ मिली किंवा स्पिनेटोराम ११.७% एससी @१८० मिली किंवा थायोमेथॉक्झाम १२.६% + लेम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५% झेडसी @८० मिली प्रति एकर याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
37
25
इतर लेख