AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आपल्या उसात खोड किडीचा प्रादुर्भाव आहे? तर हे नक्की वाचा!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आपल्या उसात खोड किडीचा प्रादुर्भाव आहे? तर हे नक्की वाचा!
प्रादुर्भावाची लक्षणे:- खोडकिडीचा प्रादुर्भाव उसाच्या सुरवातीच्या वाढीच्या काळात कांड्या तयार होण्याच्या आधी होतो. खोड किडीची अळी उसाच्या खोडाला छोटेसे छिद्र करून आतमध्ये प्रवेश करते आणि खोडामधील आतील भागावर उपजीविका करते. या किडीच्या प्रादुर्भावामुळे १ ते ३ महिने उसात पोंगेमर म्हणजे शेंडा जळाल्यासारखी लक्षणे दिसतात. असे शेंडे हाताने ओढल्यास सहजपणे हातात येतात आणि या शेंड्याचा कुजल्यासारखा वास येतो. किडीच्या प्रादुर्भावामुळे जेठा कोंब जळून जातो. सुरवातीच्या काळात जर प्रादुर्भाव झाला तर पूर्ण गड्डा जळून गेल्यामुळे शेतात खूप तूटआळे (गॅपिंग) होते. या किडीचा प्रादुर्भाव आढळून येताच नियंत्रणाचे उपाय अवलंबणे गरजेचे असते. नियंत्रणासाठी उपाय:- १) सुरु उसाची लागण करताना डिसेंबर किंवा जानेवारी मध्ये करावी त्यामुळे खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो. २) हिरवळीची खत म्हणून ज्या शेतात धैंचा गाढला असेल तर अश्या शेतात खोडकिडीचा प्रादुर्भाव खूप कमी प्रमाणात होतो. ३) ४५ ते ५० दिवसानंतर उसाला माती लावून ग्यावी व बाळबांधणी वेळेत करावी त्यामुळे खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होते. ४) शेतात पोंगेमर झाली असेल तर ती काढून नष्ट करून टाकावेत. ५) किडीच्या सर्वेक्षणासाठी शेतात १० कामगंध सापळे प्रति हेक्टरी या प्रमाणात लावावेत. रासायनिक नियंत्रण:- क्लोरँट्रेनिलिप्रोल १८.५ एससी @१५० मिली प्रति एकर आळवणी करावी.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि माहिती उपयुक्त वाटल्यास व आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
43
8
इतर लेख