AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आपली संस्कृती आपला वारसा.... बैलपोळा !
दिनविशेषAgrostar
आपली संस्कृती आपला वारसा.... बैलपोळा !
🐂बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या कष्टाचे आभार मानण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा केला जातो. या सणाला त्यांच्या एकूणच परिवारासाठी अत्यंत उत्साह असतो नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो असा सर्वाचा सण बैलपोळा. 🐂बैलपोळा दिनाचे महत्त्व: भारतीय अर्थव्यवस्थेत जेवढे कृषी क्षेत्र महत्वाचे तेवढे शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे ती बैलजोडी. शेती उत्पादनात शेतकऱ्यांपेक्षा ज्यांची महत्वाची भूमिका असते अशा या बैलांचा सण म्हणजेच बैलपोळा. वर्षभर शेतामध्ये राबणाऱ्या बैलांसाठी हा एकमेव सण आहे. दुष्काळ असो किंवा अतिवृष्टी सर्व बाजूला सारुन शेतकरी हा पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करीत असतो. पोळ्याच्या पूर्वसंध्येला खांदामळणी केली जाते तर पोळ्यादिवशीचा उत्साह काही औरच असतो. केवळ खेडे गावातच नाहीतर शहरीभागातही हा सण साजरा होत आहे.गेली दोन वर्ष या सणावर देखील कोरोनाचे सावट होते पण यंदा मोठा उत्साह राहणार आहे. श्रावणातील प्रत्येक व्रत-वैकल्ये, सण-उत्सव यांना धार्मिक महत्त्व आहे, तसे ते शास्त्रीय, व्यवहारिक, नैसर्गिक, कृषी यादृष्टिने ते महत्त्वाचे आहेत. 🐂असा होतो बैलपोळा साजरा : पोळा सणाचा उत्सव हा दोन दिवासांचा असतो. पहिल्या दिवशी खांदामळणी केली जाते. जी बैलजोडी वर्षभर आपल्या खांद्यावर ओझे वाहातात त्याच खांद्याची पूजा करुन त्याची मळणी केली जाते. शिवाय या दिवशी जनावरे स्वच्छ धुतली जातात. तर सायंकाळी पूजा करुन खांदामळणी केली जाते. दुसऱ्या दिवशी पुन्हा जनावरे धुतली जातात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. गायीबरोबर बैलांचे लग्न लावले जाते. यामध्ये वेगवेगळ्या मंगळआष्टीकाही असतात. गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखवतात. 🐂अशी होते सजावट : बैल सजवितात व मिरवणुकीत भाग घेतात. या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. या दोन दिवसाच्या काळात बैलाला कोणत्याही कामाला हटवले जात नाही. दुपारनंतर मात्र शेतामध्ये आणि खेडेगावातील प्रत्येक घरात वेगळाच उत्साह असतो. शेतशिवारात बैलांची सजावट आणि घरोघरी नैवद्य करण्याची लगबग असते. गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. 🐂संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
3