AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आनंदाची बातमी !मोदी सरकार शेतकऱ्यांना घरबसल्या देणार 6 हजार !
समाचारAgrostar
आनंदाची बातमी !मोदी सरकार शेतकऱ्यांना घरबसल्या देणार 6 हजार !
➡️पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दिलेले पैसे आता टपाल खात्यामार्फत हस्तांतरित करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. ➡️शासनाच्या या निर्णयानुसार पोस्टमन शेतकऱ्यांच्या घरी जाऊन किसान सन्मान निधीचे पैसे थेट त्यांच्या हातात देणार आहेत. पोस्टमन त्यांच्यासोबत हॅन्ड होल्ड मशीन आणतील, ज्यावर शेतकर्‍यांना अंगठा लावावा लागेल. त्यानंतर ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल. ➡️सरकारने ही जबाबदारी टपाल खात्याच्या हाती सोपवली आहे. ही सुविधा सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना बँकेत जाण्याची गरज भासणार नाही.सध्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेंतर्गत 6000 रुपये मिळतात. ही रक्कम प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते.दर 4 महिन्यांनी ही मानधनाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. याबाबत टपाल विभागाने टपाल कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. ➡️शेतकऱ्यांना बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करावे लागेल:- पीएम किसान योजनेंतर्गत पोस्टमन शेतकऱ्यांच्या घरी येऊन त्यांना त्यांचे पैसे काढण्यास मदत करेल. पोस्ट विभाग शेतकऱ्यांना इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमार्फत पैसे काढेल आणि पोस्टमनद्वारे त्यांच्या घरी पाठवेल. यासाठी शेतकऱ्यांना त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करावे लागणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही सेवा पूर्णपणे मोफत असेल. ➡️संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
52
9
इतर लेख