क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषि वार्ताTV9
आनंदाची बातमी! देशातील पहिला सीएनजी ट्रॅक्टर लवकरच येणार!
👉भारतात प्रथमच डिझेल ट्रॅक्टर सीएनजीवर चालविण्यात येणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी शुक्रवारी याचा शुभारंभ करणार आहेत. रावमट टेक्नो सोल्यूशन्स आणि टॉमासेटो अचिले इंडियाद्वारे संयुक्तपणे तयार करण्यात आलेल्या या ट्रॅक्टरच्या प्रयोगानं शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करण्यात आणि ग्रामीण भारतात अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास मदत करेल. 👉केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, नरेंद्रसिंग तोमर, पुरुषोत्तम रुपाला आणि जनरल (सेवानिवृत्त) व्ही. सिंगही उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. अशा प्रकारे इंधनाच्या किमतीवर वर्षाकाठी १ लाखापेक्षा जास्त रुपयांची बचत केल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. याशिवाय त्यांचे उत्पादन वाढण्यासही मदत मिळणार आहे. सीएनजी ट्रॅक्टरबद्दल जाणून घ्या सर्वकाही 👉हे एक स्वच्छ इंधन आहे, कारण त्यात कार्बन आणि इतर प्रदूषकांचे प्रमाण कमी आहे. कारण हा गैर- संक्षारक, जाड आणि कमी प्रदूषण करणारा असून, इंजिनचे आयुष्य वाढविण्यात मदत होणार आहे. विशेष म्हणजे हे अत्यंत स्वस्त आहे, कारण सीएनजीचे दर पेट्रोलच्या किमतीतील चढउतारांपेक्षा अधिक कमी आहेत. 👉सीएनजी वाहनांचे सरासरी मायलेजदेखील डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा चांगले आहे. तसेच हे खूप सुरक्षित आहे, कारण सीएनजी वाहनांमध्ये सीलबंद टाक्या असतात, ज्यामुळे रिफ्युएलिंग किंवा गळती झाल्यास स्फोट होण्याची शक्यता कमी करते. सध्या जगातील सुमारे १ कोटी २० लाख वाहने नैसर्गिक वायूवर ​​चालविली जातात. 👉दिवसेंदिवस अधिकाधिक कंपन्या आणि नगरपालिका सीएनजीला चालना देण्यासाठी व बायो-सीएनजी उत्पादनासाठी शेतातील पराली म्हणजेच गवताचा कच्च्या मालाच्या स्वरूपात वापर केला जाऊ शकतो. ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या स्वत: च्या क्षेत्रात बायो-सीएनजी युनिट्स तयार करण्यास मदत होईल. शेतकर्‍यांना १ लाख रुपयांचा लाभ मिळणार 👉इंधनाच्या किमतीवर वर्षाकाठी एक लाख रुपयांहून अधिक बचत करण्याचा शेतकऱ्यांना सर्वात महत्त्वाचा फायदा होणार आहे. चाचणी अहवालात म्हटले आहे की, रिट्रोफिटेड ट्रॅक्टर डिझेलवर चालणार्‍या इंजिनपेक्षा जास्त/समान ऊर्जा उत्पन्न करतो. यामुळे डिझेलच्या तुलनेत एकूण कार्बन उत्सर्जन ७०% टक्क्यांनी कमी होते आणि यामुळे इंधनावरील किमतीवर ५०% टक्क्यांपर्यंत बचत होणार आहे, कारण सध्या डिझेलची किंमत ७७.४३ रुपये आहे तर सीएनजी फक्त ४२ रुपये प्रति किलो आहे. संदर्भ - TV9, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
83
15
संबंधित लेख