योजना व अनुदानAgroStar
आधार पुराव्याशिवाय सबसिडी मिळणार नाही!
👉🏻केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसाठी अनेक योजना असून त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड हे महत्त्वाचे दस्तऐवज आहे. जर तेच नसेल तर सरकारी योजनांच्या लाभापासून शेतकरी वंचित राहू शकतो. तर आता पामवर सबसिडी हवी असेल तर आधार कार्ड द्यावेच लागेल असा नवा नियम केंद्र सरकारने केला आहे.कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पाम शेतकऱ्यांनी त्यांच्या अर्जासोबत आधार कार्डचा पुरावा सादर नाही केला. तर त्यांना पाम सबसिडीला मुकावे लागणार आहे. या शेतकऱ्यांना केंद्रीय अनुदानाचा लाभ मिळू शकणार नाही.
👉🏻पाम सबसिडी:
याबाबत कृषी मंत्रालयाच्या अहवालात, पाम उत्पादकांसाठी आधार पुरावा अनिवार्य केला असून पाम लागवडीमध्ये केंद्रीय अनुदान हवे असेल, तर आधार कार्ड देणे आवश्यक आहे असे म्हटले आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल अशाच शेतकऱ्यांना पामशी निगडीत अनुदान मिळेल असे म्हटले आहे. यामुळे आता ज्या शेतकऱ्यांना पाम सबसिडी हवी आहे, अशा शेतकऱ्यांना आधार कार्डची माहिती द्यावी लागणार आहे.
👉🏻अनुदानाचे कारण काय?
सध्या कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमतींमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तर कच्च्या पाम तेलाच्या किमतीत घसरण होत असते. यामुळे पाम तेल उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढता यावे यासाठी हे अनुदान दिले जाते. सरकार अनुदानाचे पैसे डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करते. पाम शेतकऱ्याचे होणारे नुकसान टाळून पामची शेती सुरू ठेवता यावी म्हणून हे अनुदान दिले जाते आहे.
👉🏻संदर्भ : Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.