AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आधार कार्ड शिवाय देखील मिळेल LPG सिलेंडर वर सबसिडी, करा हे काम पूर्ण!
कृषि वार्तालोकमत न्युज १८
आधार कार्ड शिवाय देखील मिळेल LPG सिलेंडर वर सबसिडी, करा हे काम पूर्ण!
👉घरगुती एलपीजी गॅसचे बुकिंग केल्यानंतर पाठवण्यात येणारी सबसिडी (LPG Cylinder Subsidy) सरकारकडून ग्राहकांच्या खात्यामध्ये थेट पाठवली जाते. 👉अशावेळी तुम्हाला देखील सबसिडी मिळत असेल, तर तुमच्या गॅस कनेक्शनशी तुमचे आधार लिंक असणे अत्यंंत आवश्यक आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड (Aadhar Card) नाही आहे किंवा कोणत्याही कारणास्तवर आधार आणि गॅस कनेक्शन लिंक नाही आहे तर देखील तुम्ही सबसिडी मिळवू शकता. 👉मात्र याकरता थोडी अधिक मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. वाचा याकरता तुम्हाला काय करावे लागेल. सबसिडीचा फायदा घेण्यासाठी करावे लागेल हे काम 👉गॅस सबसिडी मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन एलपीजी डिस्ट्रिब्यूटरला बँक खाते क्रमांक द्यावा लागेल 👉ज्यानंतर ग्राहकांच्या खात्यामध्ये सबसिडीची रक्कम थेट जमा होईल 👉बँक खात्याच्या माहितीमध्ये तुम्हाला खातेधारकाचे नाव, बँक खाते क्रमांक, बँकेच्या शाखेचा आयएफएससी (IFSC Code) कोड आणि 17 अंकी एलपीजी कंझ्यूमर आयडी द्यावा लागेल. 👉ही सुविधा त्याच ग्राहकांना देण्यात आली आहे, ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही आहे. 👉ऑनलाइन पद्धतीने गॅस कनेक्शनशी अशाप्रकारे लिंक करा तुमचं आधार कार्ड. 👉सर्वात आधी तुम्हाला तुमचा मोबाइल क्रमांक इंडेन गॅस कनेक्शनमध्ये रजिस्टर करावा लागेल. 👉यानंतर आधारच्या अधिकृत वेबसाइटवर जा. 👉याठिकाणी तुम्हाला आवश्यक डिटेल्स भरावे लागतील संदर्भ - लोकमत न्युज १८, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
66
10