कृषी वार्तालोकमत न्युज१८
आधार कार्ड अपडेट करण्यास समस्या येतेय? इथे करा तक्रार
आधार कार्ड आवश्यक सरकारी दस्तऐवज आहे. काही वेळा आधार कार्डवरील तपशीलात बदल करण्याची गरज भासते. उदाहरणार्थ पत्ता बदलला, किंवा नावात बदल, मूळ कार्डवर काही चूक झाली असेल, तर ती दुरुस्त करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यातील अनेक बदल आजकाल घरबसल्या ऑनलाईन पद्धतीनं करता येतात. कॉल करून तक्रार नोंदवण्यासाठी - ➡️ हिंदुस्थान डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, आधारशी संबंधित कोणतीही तक्रार करण्यासाठी तुम्ही 1947 या क्रमांकावर कॉल करू शकता. हिंदी, इंग्रजी, तेलगू, कन्नड, तामिळ, मल्याळम, पंजाबी, गुजराती, मराठी, उडिया, बंगाली, आसामी आणि उर्दू अशा 12 भाषांमध्ये ही सेवा उपलब्ध आहे. वेबसाइटवर तक्रार करण्यासाठी - - सर्व प्रथम यूआयडीएआय https://resident.uidai.gov.in/ च्या अधिकृत वेबसाइटवर जा. - आता इथे Contact आणि Support वर क्लिक करा. - यानंतर तुमचा 14 अंकी नोंदणी क्रमांक भरा. - यानंतर दिवस, महिना आणि वर्षासह वेळही टाकावी लागेल. - आता नाव, ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. - लोकेशन टॅबमध्ये पिन क्रमांक टाकून, लिस्टमधून गाव किंवा शहराचं नाव निवडावं लागेल. - यानंतर तक्रारीचा प्रकार, त्याची श्रेणी आणि समस्या नोंदवावी लागेल. - शेवटी वेबसाईटवर असलेला सिक्युरिटी कोड टाकावा लागेल. - ही सर्व माहिती सबमिट करताच तक्रार नोंदविली जाईल. ई-मेलद्वारेही तक्रार करणं शक्य - ➡️ तुम्हाला ई-मेलद्वारे तक्रार करायची असेल, तर help@uidai.gov.in वर आपली तक्रार लिहून पाठवावी लागेल. यूआयडीएआयचे अधिकारी वेळोवेळी हे मेल तपासून लोकांच्या तक्रारी दूर करतात. ते आपल्या ई-मेलला प्रतिसाद देतात आणि समस्या दूर करतात. त्यामुळे आता तुम्हाला आधारकार्ड बाबत कोणतीही समस्या असेल तर एका फोनद्वारे किंवा ईमेलद्वारे तुम्ही ती दूर करू शकता. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- लोकमत न्युज१८ हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
7
2
इतर लेख