आधार कार्डसंदर्भात केला अलर्ट जारी, आता फसवणूक टाळा!
कृषी वार्ताTV9 Marathi
आधार कार्डसंदर्भात केला अलर्ट जारी, आता फसवणूक टाळा!
➡️ आधार कार्ड हे आजकाल वैयक्तिक ओळख पुराव्याचे प्रमुख साधन बनलेय. म्हणूनच त्याचा उपयोग प्रत्येक महत्वाच्या कामासाठी केला जातोय. परंतु यामुळे बरेच लोक आधारचा गैरवापरही करतात. ➡️ अशा परिस्थितीत युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियाने एक इशारा दिलाय. सर्व 12 अंकी संख्या आधार मानली जाऊ नयेत, अन्यथा आपण फसवणुकीचे शिकार होऊ शकता. म्हणून कार्डधारकाचा ओळख पुरावा म्हणून आधार कार्ड स्वीकारण्यापूर्वी याची खात्री करून घ्या. ➡️ ओळख पुरावा म्हणून स्वीकारण्यापूर्वी आधारची पडताळणी करणे आवश्यक आधार कार्ड पडताळणी ऑनलाईन करता येते. यासाठी यूआयडीएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर uidai.gov.in/verify वर लॉगिन करा. यासंदर्भात यूआयडीएआयने एक ट्विटही केलेय. ज्यामध्ये हे लिहिले आहे की, “सर्व 12 अंकी संख्या आधार नाहीत. ओळख पुरावा म्हणून स्वीकारण्यापूर्वी आधारची पडताळणी करणे आवश्यक आहे. ” आधार कार्ड पडताळणीची प्रक्रिया 1. आधार कार्ड नंबरच्या पडताळणीसाठी uidai.gov.in/ सत्यापित वेबसाईटवर लॉगिन करा. 2. आता 12 अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि सुरक्षा कोड किंवा कॅप्चा प्रविष्ट करा. 3. मग Verify या ऑप्शनवर क्लिक करा. 4. असे केल्याने 12 आकडी क्रमांकाची सत्यता आपल्या संगणकावर मॉनिटर किंवा स्मार्टफोनच्या स्क्रीनवर दिसून येईल. आधारशी संबंधित समस्या घरबसल्या करा दूर ➡️ आधारशी संबंधित त्रुटी दूर करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) एक टोल फ्री नंबर 1947 जारी केलाय. हा हेल्पलाईन नंबर आपल्याला आधार नोंदणी केंद्रे, नोंदणीनंतर आधार क्रमांकाची स्थिती आणि इतर आधारशी संबंधित माहिती मिळविण्यात मदत करेल. याशिवाय आपले आधार कार्ड गहाळ झाले किंवा जरी अद्याप पोस्टद्वारे प्राप्त झाले नाही तरीही आपण या सुविधेचा लाभ घेऊ शकता. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
5
इतर लेख