AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आधार कार्डला जोडला जाणार जाती-उत्पन्न दाखला!
समाचारLokmat news 18
आधार कार्डला जोडला जाणार जाती-उत्पन्न दाखला!
➡️आता केंद्र सरकार एक मोठी यंत्रणा उभा करत आहे. ज्याचा फायदा लाखो लोकांना होणार आहे. ऑटोमॅटिक व्हेरिफिकेशन सिस्टीम अंमलात आणण्यासाठी केंद्र सरकारचे विविध प्रयत्न चालू आहेत. मात्र आता त्याआधी केंद्र सरकारने जातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला या गोष्टीदेखील आधार कार्डशी लिंक करण्याची योजना तयार केली आहे.या नव्या योजनेमुळे लोकांना केंद्र सरकारकडून जी आर्थिक मदत केली जाते किंवा जो आर्थिक व्यवहार केला जातो अगदी शासकीय योजनांचे पैसे असले तरीही हे पैसे थेट लोकांच्या खात्यात जमा होण्यास मदत होणार आहे. या योजनेचा फायदा विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त प्रमाणात होणार आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी ही यंत्रणा उपयोगात येणार आहे. ➡️ऑटोमॅटिक व्हेरिफिकेशन सिस्टीम- आधार आणि जातीचा तसंच उत्पन्नाचा दाखला जोडला गेल्यामुळे सरकारला ऑटोमॅटिक व्हेरिफिकेशन सिस्टीम अंमलात आणण्यास मदत होणार आहे. या सिस्टीमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटण्याचं काम सोपं होणार आहे. केंद्र सरकार महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांपासून ही सुविधा सुरू करणार आहे. याला कारण म्हणजे, या राज्यांनी विद्यार्थ्यांचा जातीचा आणि उत्पन्नाचा दाखला आधारला लिंक करण्याचं काम पूर्ण केलं आहे. ➡️संदर्भ: Lokmat news 18 हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
1
इतर लेख