कृषी वार्तान्यूज18
‘आत्मा योजने’ssच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट
नवी दिल्ली – केंद्र शासनाने 'आत्मा' (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन एजन्सी) नावाने एक योजना तयार केली असून, या अंतर्गत कृषी संबंधित विविध योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना शेती करण्याचे आधुनिक प्रशिक्षण मिळू शकते. ही योजना ६८४ जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण, प्रात्यक्षिक, अभ्यास, दौरे, शेतकरी मेळावे, शेतकरी गटांना एकत्रित आणणे व फार्म शाळांचे संचालनदेखील होणार आहे. कृषी शास्त्रज्ञ आणि शेतकरी यांच्यात चांगले समन्वय स्थापित करणे हे देखील या योजनेचा हेतू आहे. याची योग्य अंमलबजावणी केल्यास शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढू शकते. वैज्ञानिक पद्धतीने लागवड केल्यास कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळू शकते. आतापर्यंत १९.१८ लाख शेतकर्‍यांना नवीन तंत्रज्ञानासह शेती करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले की, भारतीय कृषी संशोधन परिषद त्यांच्या कृषी विज्ञान केंद्रे (केव्हीके) नेटवर्कच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचे मूल्यांकन, प्रात्यक्षिक व शेतकर्‍यांची क्षमतेच्या विकासाचे कार्य करतात. यावर्षी त्यांनी १५.७५. लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. तांदूळ, गहू, डाळी, धान्य व पौष्टिक धान्ये यांचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी ३,४२,१८८ शेतकर्‍यांना प्रशिक्षण दिले आहे. फलोत्पादन विकास अभियानांतर्गत फळ, भाजीपाला, मशरूम, मसाले, फुलझाडे, सुगंधी वनस्पती, नारळ, काजू आणि बांबू इत्यादी पिकांसाठी सुमारे १,९१,०८६ शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. संदर्भ – न्यूज १८, १५ डिसेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
153
0
इतर लेख