AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आता LPG गॅस सिलेंडरवर मिळवा 100 रुपयांपर्यंतची सूट, वाचा कसा मिळवाल फायदा.
कृषि वार्तान्युज १८ लोकमत
आता LPG गॅस सिलेंडरवर मिळवा 100 रुपयांपर्यंतची सूट, वाचा कसा मिळवाल फायदा.
👉पेट्रोल-डिझेल पाठोपाठच गेल्या काही महिन्यात एलपीजी गॅस सिलेंडरचे दर वाढले आहेत. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला चाप बसत आहे. गेल्या दोन महिन्यात गॅसचे दर साधारण १२५ रुपयांनी वधारले आहेत. अशावेळी ही किंमत चुकवताना काहीशी सूट मिळवण्याचा प्रयत्न ग्राहक करतात. 👉तुम्हाला देखील अशी सूट हवी असेल तर तुम्ही काही डिजिटल पेमेंट अॅप्सचा (Digital Payment Apps) वापर करून ही सवलत मिळवू शकता. एलपीजी गॅस सिलेंडर विकत घेताना तुम्ही पेटीएम वरून पेमेंट करत असाल तर तुम्हाला यामध्ये १०० रुपयांपर्यंत सूट मिळेल. 👉पेटीएमने दिलेल्या माहितीनुसार, पेटीएमच्या माध्यमातून पहिल्यांदा गॅस सिलेंडर बुक करणाऱ्यांना १०० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. तुम्ही पेमेंट केल्यानंतर एक स्क्रॅचकार्ड दिलं जाईल, ते स्क्रॅच केल्यानंतर तुम्हाला किती कॅशबॅक मिळाला आहे हे तुम्हाला समजेल. हा कॅशबॅक १०० रुपयांपर्यंत आहे, त्यामुळे तो या किंमतीपेक्षा कमी देखील असू शकतो. या ऑफरचा फायदा तुम्हाला ३१ मार्चपर्यंत घेता येणार आहे ....तर मिळणार नाही कॅशबॅक 👉ही सूट मिळवण्यासाठी पेटीएमने काही अटी व शर्ती लागू केल्या आहेत. जे पहिल्यांदा पेटीएमवरून सिलेंडर बुक करत आहेत, त्यांनाच हा फायदा मिळणार आहे. तुम्ही या आधी पेटीएमवरून बुकिंग केलं असेल तर तुम्हाला एलपीजी गॅसच्या किंमतीत सवलत मिळणार नाही. 👉तुम्ही ३१ मार्चपर्यंतच ही ऑफर मिळवू शकतो. पेमेंट केल्यानंतर जे स्क्रॅचकार्ड मिळेल ते ७ दिवसांत स्क्रॅच करणं अनिवार्य आहे अन्यथा ते वैध राहणार नाही. स्क्रॅच केल्यानंतर जी रक्कम तुम्हाला कॅशबॅक स्लरुपात मिळणार आहे ती २४ तासांत तुमच्या पेटीएम वॉलेटमध्ये जमा होईल. संदर्भ -न्युज १८ लोकमत, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
43
11
इतर लेख