AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आता सातबारा उतारा होणार बंद; जाणून घ्या सविस्तर!
कृषी वार्ताSakal
आता सातबारा उतारा होणार बंद; जाणून घ्या सविस्तर!
➡️ आपण जमिनीचे मालक आहोत हे सिध्य करण्यासाठी सातबारा हा एक पुरावा असतो. पण आता सातबारा बंद होणार आहे. हा सातबारा उतारा बंद करण्याचा निर्णय भूमी अभिलेख कार्यालयाने घेतला आहे. आता राज्यातील ज्या शहरांमध्ये सिटी सर्व्हे झाले आहेत. त्या ठिकाणी सातबाऱ्याऐवजी प्रॉपर्टी कार्ड सुरू करण्यात येणार आहे. काय आहे हे प्रॉपर्टी कार्ड ➡️ सातबाऱ्यावर ज्या प्रकारे एखाद्या मालकीची शेतजमीनीची माहिती मिळते त्याचप्रमाणे प्रॉपर्टी कार्ड वर एखाद्या व्यक्तीच्या नावे किती किती बिगर शेतजमीन आहे याची माहिती दिली जाते. आपल्या मोबाईल वरून देखील हे डिजिटल प्रॉपर्टी कार्ड काढता येऊ शकते. प्रॉपर्टी कार्ड म्हणजे मिळकत पत्रिका किंवा मालमत्ता पत्रक आहे. ➡️ भूमी अभिलेख विभागाने प्रॉपर्टी कार्ड च्या वापरात सुलभता यावी यासाठी एनआयसी च्या मदतीने संगणक प्रणाली विकसित केली आहे. यामुळे खरेदी विक्रीच्या व्यवहारात होणारी फसवणूक टळणार आहे. ➡️ आधीच प्रॉपर्टी कार्ड भूमी अभिलेख विभागाने तयार केले होते. पण सातबारा उतारे बंद केले न्हवते यामुळे जागांच्या खरेदी विक्रीच्या ठिकाणी सोयीनुसार सातबारा उताऱ्यांचा वापर केला जातोय. यातूनच फसवणुकीचे प्रकार घडत आहेत म्हणून भूमी अभिलेख विभागाने सिटी सर्व्हे झालेल्या भागातील सातबारा उतारा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. संदर्भ:- Sakal, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
81
20
इतर लेख