क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषि वार्ताअॅग्रोवन
आता साखरेपासून इथेनॉल निर्मितीला मान्यता
नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाने थेट साखरेपासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली आहे. त्याचबरोबर ‘सी’ हेव्ही मोलॅसिस, ‘बी’ हेव्ही मोलॅसिस व थेट ऊसाचा रस, साखर व साखरयुक्त पदार्थांपासून निर्मित केलेल्या इथेनॉलच्या दरात वाढ केली आहे. ही वाढ शासकीय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. व भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. या कंपन्यांच्या खरेदीसाठी आहे. केंद्र शासनाने तीनही प्रकारच्या इथेनॉल खरेदीदरात वाढ केली आहे. ‘सी’ हेव्ही मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलसाठी प्रतिलिटर २९ पैशांची वाढ केली असून ४३.४६ रूपयांवरून प्रतिलिटर ४३.७५ रूपयांवर दर पोचला. ‘बी’ हेव्ही मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या दरात प्रतिलिटर १.८४ रू. वाढ करण्यात आली आहे. आता ‘बी’ हेव्ही मोलॅसिसचा दर ५२.४३ रू. वरून प्रतिलिटर ५४.२७ रूपयांवर पोचला आहे. थेट ऊसापासून निर्मित होणाऱ्या इथेनॉलसाठी ३५ पैशांची वाढ करण्यात आली असून ५९.१३ रू. असणारा दर प्रतिलिटर ५९.४८ रू. पोचले आहे. संदर्भ – अॅग्रोवन, ४ सप्टेंबर २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
45
0
संबंधित लेख