AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आता, शेतकऱ्यांना मिळणार रेडिओच्या माध्यमातून माहिती
कृषि वार्तासकाळ
आता, शेतकऱ्यांना मिळणार रेडिओच्या माध्यमातून माहिती
औरंगाबाद – सर्वसामान्य शेतकाऱ्यांना हवामानातील बदल व त्यावर आधारित शेतीसंबंधी मागदर्शन मिळावे यासाठी आयोगातर्फे ‘हवामानातील बदल आणि शेती’ या विषयावर ‘कम्युनिटी रेडिओ’ सुरू होणार आहे. येत्या महिन्याभरात हा रेडिओ सुरू होणार असल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली.
पाशा म्हणाले, हवामानातील बदलाविषयी आमचा अभ्यास सुरू आहे. पूर्वी आपल्याकडे २७ नक्षत्रे होती. आता दोनच एक ढगफुटी व दुसरे दुष्काळ दोन्ही नक्षत्रांमुळे शेतीचे कसे नुकसान होत आहे, त्यापासून पिके वाचविण्यासाठी काय करावे, याची माहिती या रेडिओतून दिली जाणार आहे. यासाठी आम्ही सर्व परवानगी घेतल्या आहेत. कदाचित हवामानातील बदल व शेती या विषयांवर माहिती देणारा देशातील पहिला कम्युनिटी रेडिओ असेल, असा दावाही त्यांनी यावेळी केला. संदर्भ – सकाळ, ९ नोव्हेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
22
0