AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
आता, शेतकऱ्यांचे वाचेल वेळ अन् कष्ट!
👉 शेतकऱ्यांना पूर्वी महाडीबीटी अंतर्गत कृषी सामग्री, बि- बियाणे अशा विविध योजनेचा अर्ज भरण्यासाठी वणवण फिरावे लागत असायचे. या योजनेंचा लाभ घेताना अनेक समस्यांना सामोरेदेखील जावे लागायचे. या सर्व गोष्टींचा विचार करूनच शासनाने शेतकऱ्यांची ही होणारी धडपड थांबविण्यासाठी ‘महाडीबीटी फार्मर’ अ‍ॅप्लीकेशन लाँच केले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे वेळ अन् कष्ट नक्कीच वाचणार आहे. 👉 शेतकऱ्यांनी महाडीबीटी माध्यमातून सर्व योजनेचे अर्ज, अर्जासंबंधी कागदपत्रे डाउनलोड करणे, अर्जांची स्थिती पाहण्यासाठी शेतकऱ्यांना कुठे ही न जाता ‘महाडीबीटी फार्मर’ अ‍ॅप्लीकेशनवर पाहता येणार आहे. म्हणजेच योजनेसंबंधी सर्व कामकाज आता तुम्ही घरबसल्या पाहू शकता. मग, चला हे अ‍ॅप्लीकेशन कसे डाउनलोड करायचे याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ आवश्य पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
7
इतर लेख