AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आता रेशन कार्डशी संबंधित काम कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये(CSC) होणार!
सल्लागार लेखNews 18 lokmat
आता रेशन कार्डशी संबंधित काम कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये(CSC) होणार!
➡️ अनेक शासकीय योजनांचे लाभ रेशन कार्डद्वारे दिले जात आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकार रेशन कार्ड धारकांना नोव्हेंबरपर्यंत मोफत रेशन देत आहे. अशा परिस्थितीत, रेशन कार्ड हा असा दस्तऐवज आहे, ज्याच्या मदतीने तुम्हाला सरकारकडून मोफत रेशन मिळते. देशभरातील 3.70 लाख CSC मधून शिधापत्रिका सेवा उपलब्ध करून दिल्या जातील. या भागीदारीमुळे देशाच्या मोठ्या भागातील सुमारे 23.64 कोटी लोकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. ➡️ रेशन कार्डशी संबंधित ही कामे CSC वर केली जातील डिजिटल इंडिया ट्विटनुसार, रेशन कार्ड अद्ययावत करणे, डुप्लिकेट रेशन कार्डची प्रिंट घेणे, रेशन कार्डला आधारशी जोडणे, रेशन कार्डची स्थिती तपासणे, नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करणे आणि रेशन कार्डशी संबंधित तक्रारी यासारख्या रेशन कार्ड सेवा देखील करता येतात. १० प्रकारची कागदपत्रे आवश्यक ➡️ नवीन रेशन कार्ड बनवण्यापासून कार्डाचे नूतनीकरण करण्यापर्यंत किंवा त्यात नवीन सदस्याचे नाव जोडण्यापर्यंत, आता सुमारे १० प्रकारची कागदपत्रे आवश्यक झालीत. अहवालांमध्ये असे सांगण्यात आले आहे की, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेशी संबंधित सॉफ्टवेअर केंद्र सरकारद्वारे चालवले जाते, ज्याद्वारे रेशन कार्ड बनवले जातात. आता ही कागदपत्रे आवश्यक आहेत- > कुटुंबप्रमुखाचा एक पासपोर्ट आकाराचा फोटो > रेशन कार्ड रद्द करण्याचे प्रमाणपत्र (आधी रद्द केले असल्यास) > कुटुंबप्रमुखाच्या बँक खात्याच्या पहिल्या आणि शेवटच्या पानाची छायाप्रत > गॅस पासबुकची फोटोकॉपी > संपूर्ण कुटुंब किंवा युनिटच्या आधार कार्डाची छायाप्रत > सदस्यांचे जन्म प्रमाणपत्र किंवा हायस्कूल प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र किंवा पॅन कार्डची छायाप्रत > जात प्रमाणपत्र (SC, ST, OBC) दस्तऐवजाची प्रत (लागू असल्यास) > दिव्यांग ग्राहकांसाठी अपंगत्वाच्या प्रमाणपत्राची छायाप्रत > मनरेगा जॉब कार्ड धारक असल्यास जॉब कार्डची छायाप्रत > उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची छायाप्रत > पत्त्याच्या पुराव्यासाठी वीज बिल, पाणी बिल, घरपट्टी, भाडेनामा यापैकी कोणत्याही एकाची प्रत 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
72
19