AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आता ६०० रुपयांत गॅस मिळणार!
समाचारAgrostar
आता ६०० रुपयांत गॅस मिळणार!
✅केंद्र सरकारच्या झालेल्या कॅबिनेट बैठकीत सर्वसामान्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदानाची रक्कम २०० रुपयांवरून ३०० रुपये केली आहे. ✅आता उज्ज्वला योजनेंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना ६०० रुपयांत घरगुती गॅस सिलिंडर मिळणार आहे. ३७ दिवसांत मोदी सरकारने दुसऱ्यांदा दर कमी केले आहेत. ज्याचा फायदा १० कोटी लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. तत्पूर्वी २९ ऑगस्टला सरकारने २०० रुपये गॅस सिलिंडरचे दर कमी केले होते. ज्याचा फायदा देशातील सर्वच ग्राहकांना झाला होता. ✅ज्या अंतर्गत देशातील सर्व गॅस सिलिंडर ग्राहकांना दिलासा देण्यात आला आहे. त्यानंतर उज्ज्वला योजनेंतर्गत २०० रुपयांच्या सबसिडीसह ४०० रुपयांची सूट आणि २०० रुपयांची कपात करण्यात आली. आता सरकारने अनुदान २०० रुपयांवरून ३०० रुपये केले आहे. त्यानंतर ७०० रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर ६०० रुपयांना उपलब्ध झाला आहे. ✅संदर्भ:-Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
35
4
इतर लेख