AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आता, ‘या’ माध्यमातून मिळणार शेतकऱ्यांना विविध योजनेविषयी माहिती
कृषी वार्ताप्रभात
आता, ‘या’ माध्यमातून मिळणार शेतकऱ्यांना विविध योजनेविषयी माहिती
पुणे – देशात लाखो शेतकऱ्यांना वाचता येत नाही. त्यांना सरकारच्या विविध योजनेविषयी माहिती पाहिजे असते. ही माहिती त्यांना फोन केल्यानंतर उपलब्ध व्हावी, याकरिता लवकरच पीएम किसान कॉल सेंटर सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
केंद्र शासनाने यावर्षी प्रधानमंत्री किसान किमान उत्पन्न योजना सुरू केली आहे. या योजनेसंदर्भात शेतकऱ्यांना पुरेशी माहिती उपलब्ध होत नाही. ती माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी हा या कॉल सेंटर निर्मितीमागील हेतू आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांना एक वर्षाला ६ हजार रूपये ३ हफ्त्यात दिले जाणार आहेत. सध्या शेतकऱ्यांसाठी एक हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. मात्र, त्यावरून पुरेशी माहिती उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी वेळोवेळी केल्या आहेत. त्यामुळे २४ तास चालणारे एक कॉल सेंटर सुरू करण्याचे प्रयत्न चालू असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. _x000D_ हे कॉल सेंटर अनेक भाषांतून असणार आहेत. त्याचबरोबर याचा दुरूपयोग केला जाणार नाही यासाठी खबरदारी घेण्यात येणार आहे. फक्त नोंदलेल्या मोबाईल नंबरवरून व्यवस्थित बॅंक खाते क्रमांक व आधार क्रमांक दिल्यानंतर या योजनेची माहिती उपलब्ध होईल. _x000D_ संदर्भ – प्रभात, २४ ऑक्टोबर २०१९ _x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
221
0