AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आता मोफत मिळवा पिठाची गिरणी असा करा अर्ज !
समाचारAgrostar
आता मोफत मिळवा पिठाची गिरणी असा करा अर्ज !
➡️महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून कुटुंबाला सबळ करण्यासाठी सरकार वेगवेगळी स्कीम राबवत असते. त्याचाच एक भाग म्हणून सरकारकडून महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. त्यातच आता सरकार महिलांना मोफत पिठाची गिरणी देणार आहे. म्हणजेच या योजनेअंतर्गत मात्र महिलांना 100 टक्के अनुदानावर पिठाची गिरणी देण्यात येणार आहे. या योजनेचा मुख्य हेतू हा खेड्यातील महिलांना रोजगार मिळावा व त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी हा आहे. ➡️पिठाची गिरणी महिलांना चांगला रोजगार उपलब्ध करून देईल आणि महिलांना घरी बसून चांगले उत्पन्न मिळेल. यामुळे ज्या महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्या महिला या योजनेचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात. महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत, नमूना अर्ज जाणून घ्या माहिती. 👉🏻या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे : 👉🏻अर्जदार ही १२ वी शिकलेली असल्याचा पुरावा 👉🏻अर्जदार महिलेच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत 👉🏻अर्जदाराचा विहित नमुन्यातील अर्ज : 👉🏻घराचा ८अ उतारा 👉🏻लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे १ लाख २० हजार पेक्षा कमी असल्याचा पुरावा (तहसीलदार कडून किंवा तलाठी कडून) 👉🏻बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स 👉🏻लाईट बिलची झेरॉक्स 👉🏻या योजनेचा लाभ हा १८ ते ६० वयोगटातील मुली व महिलांना मिळेल. ➡️संदर्भ: Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
91
31
इतर लेख