AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आता मिळणार मोफत गॅस कनेक्शन !
समाचारAgrostar
आता मिळणार मोफत गॅस कनेक्शन !
➡️केंद्र सरकार आणि राज्य सरकार लोकांच्या हितासाठी, त्यांना सुखसोयींचा अनुभव घेता यावा याकरिता वेगवेगळ्या क्षेत्रात बऱ्याच योजना आणत असतात. 1 मे 2016 रोजी सरकारने देशातील गरीब वर्गाला गॅस सिलिंडरची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत सरकारी एपीएल आणि बीपीएल कार्डधारकांना गॅस सिलिंडरची सुविधा मोफत मिळते. ➡️केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने या योजनेला सुरुवात केली होती. या योजनेमार्फत सरकार दारिद्र्यरेषेखालील आणि एपीएल कार्डधारकांना मोफत गॅस सिलिंडर देते.आतापर्यंत केंद्र सरकारने करोडो महिलांना मोफत गॅस सिलिंडरचे वाटप केले आहे. या योजनेसाठी महिलांचे वय हे 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक असते. ➡️प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी पात्रता : दारिद्र्यरेषेखालील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. फक्त या लोकांकडे बीपीएल म्हणजेच दारिद्रय रेषेखालील शिधापत्रिका असणे आवश्यक आहे.नागरिक जर वनवासी किंवा मागासवर्गीय असेल तर ते नागरिकसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. शिवाय तुमच्याकडे आधीपासूनच गॅस कनेक्शन नसावे.घरातील महिलेचे वय हे 18 वर्षांपेक्षा जास्त असावे. तसेच बँकेत खाते असणे आवश्यक आहे. ➡️योजनेसाठी ही कागदपत्रे आवश्यक : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी काही आवश्यक कागदपत्रांची गरज असते. आधार कार्ड, पासपोर्ट साइज फोटो, मोबाईल नंबर, बँक पासबुकची प्रत रेशन कार्ड, BPL कार्ड ➡️अर्ज कसा करावा : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी तुम्ही ऑनलाइन अर्जदेखील करू शकता. यासाठी pmujjwalayojana.com या त्यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. येथून एक फॉर्म डाउनलोड करा. हा फॉर्म भरून तुम्ही तो एलपीजी केंद्रात जमा करा. यानंतर तुम्हाला नवीन एलपीजी कनेक्शन सहज मिळेल. ➡️संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
7
इतर लेख