AgroStar
आता  मिळणार, १० गुंठ्या पर्यंत जमीन खरेदी विक्रीला परवानगी !
समाचारAgrostar
आता मिळणार, १० गुंठ्या पर्यंत जमीन खरेदी विक्रीला परवानगी !
☑️तुकडेबंदी, तुकडे जोड कायद्यातील कड़क निकषांमुळे कमी क्षेत्र असलेल्या अनेक शेतकऱ्यांना जमिनीची खरेदी-विक्री करता येत नसल्याने त्यात सुधारणा केली जाणार आहे. महसूल विभागाने त्यासाठी समिती नेमली असून बागायती दहा गुंठे तर जिरायती एक एकरावरील जमीन खरेदी-विक्रीस ऑगस्टपासून परवानगी मिळू शकते. ☑️जमिनीच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने क्षेत्राचे तुकडे करून त्याची खरेदी-विक्री करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याच अनुषंगाने राज्याच्या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयाने १२ जुलै २०२१ रोजी एक पत्र जारी केले त्यानुसार एखाद्या सर्व्हे नंबरचे क्षेत्र दोन एकर (८० गुंठे) असल्यास त्याच सर्व्हेतील एक-दोन गुंठे जमीन विकता येणार नाही त्यासाठी जिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकरणाची परवानगी बंधनकारक केली त्यांचे काटेकोर पालन न झाल्यास दुय्यम निबंधकांवर प्रशासकीय कारवाई करण्याचा इशाराही दिला पण, त्यामुळे मुलांचे शिक्षण, मुलीचा विवाह किंवा अन्य कौटुंबिक अडचणीतही स्वतः च्या मालकीचे क्षेत्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषाएवढे नसल्याने त्याची विक्री करता आलेली नाही तर अडचणीपुरती जमीन विकून गरज भागविण्याचा विचार करणान्यांना त्या कडक निकषामुळे सगळी जमीन विकावी लागत असल्याचेही चित्र आहे. त्यामुळे लवकरच त्यासंबंधाने सकारक निर्णय होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. ☑️काही शेतकन्यांनी शासनाच्या निकर्षाप्रमाणे २० गुंठ्यावरील बागायती क्षेत्राची तर दोन एकरावरीत जिरपती क्षेत्राची खरेदी किंवा विक्री केली पण, जमीन घेणाऱ्या तथा जमिनीची विक्री करणाया व्यक्तींची दहा गुंठयापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या सातबारा उताऱ्यावरील रस्ता किंवा विहिरीची खरेदी-विक्री करता आलेली नाही तसेच वारसाहक्काची जमीन समसमान वाटप करतानाही तसाच अडथळा येत आहे त्यातून पुढे वादाचे प्रसंगही उदभवत आहेत. ☑️शासनाच्या निणर्याप्रमाणे सध्या बागायती जमीन खरेदी- विक्रीसाठी २० गुंठे तर जिरायतीसाठी किमान ८० गुंठे क्षेत्राचे बंधन आहे अनेकांच्या अडचणी ध्यानात घेऊन शासनाने तीन महिन्यांत त्यासंबंधीच्या हरकती मागविल्या असून त्यानंतर महसूल विभागाच्या माध्यमातून अंतिम निर्णय होईल. ☑️संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
51
15
इतर लेख