AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आता बँकेचे हेलपाटे मारणे होणार बंद!
गुरु ज्ञानAgroStar
आता बँकेचे हेलपाटे मारणे होणार बंद!
👉🏻शासनाकडून निराधार व्यक्तींना विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याकाठी ठराविक मानधन दिले जाते. हे मानधन लाभार्थ्यांना तहसील स्तरावरून बँकेत पाठवून संबंधितांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया केली जाते. आता मात्र, थेट डीबीटीमार्फत म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर (थेट लाभ हस्तांतरण) निराधार अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे. 👉🏻संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभासाठी यापूर्वी तहसीलकडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थीची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात होता. तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थीच्या खात्यात वर्ग केला जात होता. या प्रक्रियेस विलंब होत होता. त्यामुळे वयोवृद्ध लाभार्थीना अनुदानासाठी बँकांत हेलपाटे घालावे लागत होते. मात्र आता निराधारांचे अनुदान थेट डीबीटीमार्फत मिळणार असल्याने निराधारांची हेळसांड थांबून बँक कर्मचाऱ्यांची कसरत थांबणार आहे. त्यासाठी या दोन्ही योजनांचा लाभ घेत असलेल्या पात्र निराधारांकडून आधारकार्ड आणि मोबाइल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया बरेच ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. 👉🏻संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी येत्या 30 मे पर्यंत श्राधारकार्ड व मोबाइल क्रमांक तलाठी यांच्याकडे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या मुदतीत आधारकार्ड व बाइल क्रमांक न देणारे लाभार्थी अनुदानापासून वंचित राहू शकतात. 👉🏻निराधार व्यक्तींना विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याकाठी ठराविक मानधन दिले जाते. ते आता डीबीटीमार्फत सरळ लाभार्थ्यांच्या खात्यात दिले जाणार आहे. यासाठी हयात असलेले प्रमाणपत्र, आधारकार्ड, बँकेचे पासबुक आणि मोबाइल र, आधार ज्या बँकेला लिंक असेल त्याच बँकेत पैसे जाणार आहेत. 👉🏻संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
30
0
इतर लेख