समाचारAgrostar
आता प्रत्येकाच्या शेतात होणार विहिर!
➡️ राज्य सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) अंतर्गत सिंचन विहिरींसाठी अनुदानाची रक्कम ३ लाखांवरून ४ लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, दोन सिंचन विहिरींमधील अंतराची अट देखील रद्द करण्यात आली आहे.
➡️या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. विहीर खोदण्यासाठी लागणारा खर्च कमी होणार असल्याने शेतकऱ्यांना सिंचन सुविधा मिळणे सोपे होईल. या निर्णयामुळे राज्यातील कृषी उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. तसेच, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास हातभार लागेल.
➡️आवश्यक कागतपत्रे
👉🏻अर्जदाराचे ड्रायव्हिंग लायसन्स / पॅन कार्ड
👉🏻शेतजमिनीची कागदपत्रे
👉🏻आधार कार्ड
👉🏻मोबाईल क्रमांक
👉🏻पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
👉🏻बँक खाते पासबुक
➡️मागेल त्याला विहीर योजना अर्ज करण्याची पद्धत:
👉🏻अर्जदार शेतकऱ्याला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील ग्राम पंचायत कार्यालयात जावे लागेल व ग्राम सेवकाकडून विहीर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल किंवा जिल्हा कार्यालयात कृषी विभागात जाऊन विहीर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून अर्जासोबत आवश्यक अशी कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावा लागेल.
➡️विहीर अनुदान योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:
👉🏻अर्जदार शेतकऱ्याला विहीर अनुदान योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
👉🏻होम पेज वर मागेल त्याला विहीर योजना यावर क्लिक करावे लागेल.
👉🏻आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल व सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील व सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल.
👉🏻अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
➡️विहीर नोंदणी अर्ज डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा👉🏻https://drive.google.com/file/d/1RP3sU2S9N-hs9p_FQwxF4lx0The_Wn5L/view
➡️संदर्भ: Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा