कृषी वार्ताकृषी जागरण
आता पेन्शची चिंता सोडा! दरमहा मिळतील ५ हजार रुपये.
अनेक नागरिकांना आपल्या वृद्धपकाळाची चिंता सतावत असते. कारण त्या काळात त्यांच्याकडे कोणते अधिकार नसतात.जवळ पैसा नसतो यामुळे अनेक जण चिंतेत असतात. हातात पैसा नसला तर त्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. परंतु अशा लोकांसाठी अटल पेंशन योजना खूप फायदेशीर आहे. जर आपल्याला आपले वृद्धपकाळ व्यवस्थित जावे असे वाटत असेल तर अटल पेन्शन योजनेत अर्ज करुन आपण पेन्शनचा लाभ घेऊ शकतात. अटल पेन्शन योजनेच्या अंतर्गत वयाच्या ६० वर्षानंतर आपल्याला प्रत्येक महिन्याला १ ते ५ हजार रुपये पेन्शन मिळेल. जर ही योजनेतील पेन्शन धारकांचा मृ्त्यू होतो तर त्याच्या नॉमनीला ५० टक्के पेन्शन मिळते. या योजनेसाठी १८ ते ४० वर्ष वय असलेले व्यक्ती अर्ज करु शकतील.दरम्यान आतापर्यंत या योजनेत २.२३ कोटी लोकांनी खाते उघडली आहे. जर कोणी वयाच्या १८ व्या वर्षापासून या योजनेशी जुडतो तर त्याला ४२ रुपयांपासून २१० रुपये प्रति महिन्याला गुंतवणूक करावी लागते. जर कोणी व्यक्ती वयाच्या ४० व्या वर्षी या योजनेचा लाभ घेतो तर त्याला दर महिन्यासाठी २९१ रुपयांपासून १४५४ रुपयांची गुंतवणूक करावी लागते. यात वयाच्या ६० वर्षापर्यंत आपल्याला पैसा जमा करावा लागतो. त्यानंतर ६० वर्षानंतर आपल्याला एक हजार ते ५ हजार रुपयांपर्यंतची पेन्शन मिळत असते. दरम्यान या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे आपल्याला ८० सी च्या अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंतच्या करात सूट मिळते. अटल पेन्शन योजनेसाठी कसा कराल अर्ज 1) अर्जकरण्यासाठी https://enps.nsdl.com/eNPS/Nationalpensionsystem.html या संकेतस्थळावर आपल्याला जावे लागेल. 2) तेथे आपल्याला आधार कार्डची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर सबमिट करावे. 3) त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. तो ओटीपी टाकल्यानंतर तो नंबर व्हेरिफिकेशन केले जाईल.त्यानंतर आपल्या बँकेची माहिती द्यावी. 4) यात अकाउंट नंबर आणि आपला पत्ता टाईप करावा. असे केल्यानंतर अकाउंट अक्टिव्ह होईल. 5) त्यानंतर नॉमनी आणि हप्ताची माहिती भरावी लागेल. आता व्हिरिफिकेशनसाठी अर्जावर स्वाक्षरी करावी. संदर्भ- १९सप्टेंबर २०२० कृषी जागरण, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
129
13
इतर लेख