नई खेती नया किसानकृषि जागरण
आता तुम्ही हि तुमच्या गावात बनवू शकता कृषी पर्यटन!
जर आपण कृषी पर्यटन या संकल्पनेचा विचार केला तर यामध्ये कृषी व पर्यटन या दोन भागांचा समन्वय हा दिसून येतो. या संकल्पनेमध्ये शेती पर्यटक शेतांना भेट देतील, शेतीचे विविध अंगे व पैलूचे दर्शन वा अनुभव घेतील, आणि शहरा कडचा कोलाहल आणि प्रदूषण मुक्त वातावरणाचा तसेच ताजा फळे व भाजीपाला खरेदी करू शकतील.
आता कृषी पर्यटनाचे उद्देश.
1)कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास आणि ग्रामीण विकसातून राज्याचा विकास साधता येऊ शकतो.
2)या माध्यमातून कृषी उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळवून देता येऊ शकते.
3)कृषी पर्यटन हा कृषी पूरक व्यवसाय आहे, त्यामुळे आहे त्या सोयी- सुविधांचा वापर होऊ शकतो.
4)ग्रामीण भागातील लोककला, हस्तकला, खाद्य संस्कृती शहरी भागापर्यंत पोचायला मदत होते.
5)ग्रामीण भागातील महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.
6)ग्रामीण व शहरी भागांत माहितीची, ज्ञानाची देवाण-घेवाण होते.
7)ग्रामीण भागातील पडीक, गायरान आणि क्षारपड जमिनीचा योग्य वापर होऊ शकतो
कृषी पर्यटन केंद्रासाठी कर्जाचा अर्ज कसा सादर करावा
कृषी पर्यटन व्यवसायासाठी कर्जाचा अर्ज सादर करताना ज्यासाठी कर्ज घ्यायचे आहे, त्या बाबत संपूर्ण माहिती दिली गेली पाहिजे.
कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे
👉 राहण्याचा दाखला व फोटो दाखला
👉 ग्रामपंचायतीचा व्यवसाय म्हणून दाखला
👉 ग्रामपंचायतीचा बांधकाम परवाना
👉 आर्किटेक्चर दाखला
👉 ज्या ठिकाणी बांधकाम करायचे या क्षेत्राचा एन ए ( कलेक्टर ) किंवा झोन दाखला इत्यादी कागदपत्र आवश्यक असतात. त्याबरोबरच जागेविषयी संपूर्ण कागदपत्रे, वकील तारण योग्यतेचा दाखला, टायटल व सर्च रिपोर्ट
👉 ज्यांच्या नावावर जमीन आहे त्यांच्या संमती पत्रक
👉 जागेचा नकाशा तसेच अन्य गट धारकांची संमती
👉 कुटुंबातील अन्य सदस्यांचे संमती पत्र
👉 जोड तारण असल्यास जोड तारणाची कागदपत्रे आर्थिक कागदपत्रे
कृषी पर्यटन हा व्यवसाय असल्याने व्याजदर हा १३ ते १५ टक्क्यांपर्यंत अपेक्षित असतो. मिळणाऱ्या कर्जाचा कालावधी हा कर्ज नुसार पाच ते दहा वर्षापर्यंत असा असू शकतो. कर्जाचा हप्ता हा मासिक, त्री मासिक किंवा वार्षिक असतो.
👉 अॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:-कृषी जागरण,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.