AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आता, डिजिटल सिस्टीमद्वारे होणार कापूस खरेदी
कृषि वार्तालोकमत
आता, डिजिटल सिस्टीमद्वारे होणार कापूस खरेदी
यवतमाळ: कापूस खरेदीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केली जाणार आहे. त्याचा पहिला टप्पा राज्यातील ४० कापूस संकलन केंद्रात सुरू करण्यात आला आहे. यामुळे कापूस विक्रीकरिता आणणाऱ्या शेतकऱ्यांचे आधारकार्ड क्यूआर कोडने स्कॅन होईल. सोबतच कापसाचा धागा, त्याची प्रतवारी ऑनलाईन पध्दतीने थेट केंद्रावरून जाणून घेता येणार आहे. कापूस खरेदी आता डिजीटल होणार आहे.
या माध्यमातून खरेदीत पारदर्शकता आणण्यासोबतच गैरप्रकाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यातील ९८ कापूस संकलन केंद्रावर पणन महासंघाने आतापर्यंत तब्बल १९ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. यातील एक हजार कोटींचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात वळते करण्यात आले आहे. ४५ कोटींचे चुकारे अदयाप प्रक्रियेत आहेत. संदर्भ – लोकमत, १६ जानेवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
15
0