AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आता जमिनीची किंमत मोबाईलवर जाणून घ्या !
कृषी वार्ताAgrostar
आता जमिनीची किंमत मोबाईलवर जाणून घ्या !
➡️आजकाल आपल्याला हवी असलेली माहिती आपल्या मोबाईलवर मिळत असते, देश विदेशातील तसेच अगदी आपल्या गाव खेड्यातील माहितीही मोबाईल आपल्याला देतो. आज आपण सरकारी नियमांनुसार आपल्या जमिनीची किंमत मोबाईलच्या माध्यमातून कशी जाणून घ्यायची याबाबत माहिती घेणार आहोत. ➡️जमीन खरेदी-विक्रीचे अनेक व्यवहार तुम्ही ऐकले आणि पाहिले असतील. परंतु जमीन खरेदी-विक्री करताना सरकारी नियमानुसार जमिनीची किंमत किती आहे आणि जमीन विकण्याची किंवा खरेदी करण्याची किंमत किती आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. या लेखात, जमिनीची सरकारी किंमत पाहण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल हे आपण जाणून घेणार आहोत. तुमच्या जमिनीची सरकारी किंमत जाणून घेण्यासाठी तुम्हाला प्रथम गुगल सर्च करून या वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला नोंदणी आणि मुद्रांक शुल्क महाराष्ट्र हा पर्याय येथे दिसेल. तुम्ही या पेजवर आल्यावर तुम्हाला त्यातील महत्त्वाच्या दुवा मध्ये जाऊन मुळकत मूल्यांकन हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक नकाशा दिसेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील जमिनीचे सरकारी दर दिसतील. ➡️शासनाने शेतीचे सात बारा व आठ अ उतारे तसेच, शासकीय दर त्याच प्रमाणे अनेक योजनांचे अर्ज वे शेतीविषयी अनेक माहिती ऑनलाईन केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे. व प्रत्येकाला मोबाईलच्या माध्यमातून माहिती मिळवणे सोपे झाले आहे. ➡️ संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
2
इतर लेख