AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आता ग्रामीण भागातही होम लोन सहज मिळणार!
समाचारन्यूज १८लोकमत
आता ग्रामीण भागातही होम लोन सहज मिळणार!
➡️शहरी भागात स्वत:चं घर खरेदी करायचं असेल तर सहजरित्या बँक होम लोन उपलब्ध होतं. मात्र ग्रामीण भागात घर खरेदी करताना लोनसाठी बऱ्याच अडचणी येतात. ➡️मात्र आता ग्रामीण भागातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. कारण स्वत:चे घर खरेदी करण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेकडून ग्रामीण भागातील नागरिकांनाही होम लोन मिळणार आहे. यासाठी इंडिया पोस्ट बॅंकने एचडीएफसीसोबत भागीदारी केली. ➡️इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने हाऊसिंग फायनान्स कंपनी एचडीएफसीशी भागीदारी करत या अंतर्गत पेमेंट बँकेच्या सुमारे ४.७ कोटी ग्राहकांना गृहकर्जाची सुविधा उपलब्ध होणार आहे. गावातील ग्राहकांचीr गरज लक्षात पोस्ट ऑफिसने हा निर्णय घेतला आहे. याचा फायदा नक्की ग्रामीण भागातील नागरिकांना होणार आहे. ➡️एचडीएफसी बँकेच्या देशभरात ६५० शाखा असून १.३६ लाख बँकिंग अॅक्सेस पॉईंट्स आहेत. बँकेच्या या नेटवर्कच्या मदतीने नागरिकांना कर्ज उपलब्ध करुन दिलं जाणार आहे. ➡️एचडीएफसी बँक आणि इंडिया पोस्ट बँक या भागीदारीद्वारे होमलोन प्रोडक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- न्युज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
41
6
इतर लेख