AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आता, गावातील पाणी टंचाईची माहिती उपलब्ध होणार
कृषि वार्तापुढारी
आता, गावातील पाणी टंचाईची माहिती उपलब्ध होणार
पुणे – टंचाईची गावनिहाय माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. यामुळे टंचाईच्या परिस्थितीवर उपाययोजना कोणत्या कराव्यात, याकरिता प्रशासनाला वाट पाहावी लागणार नाही. ‘महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अँप्लिकेशन सेंटर’च्या माध्यमातून ही प्रणाली विकसित करण्यात येत आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात असून, डिसेंबरपर्यंत माहिती नकाशात दिसणार आहे.
प्रामुख्याने एप्रिलनंतर पाण्याची टंचाई जाणवेल, याची गावनिहाय माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. जिल्हा, तालुका व गावनिहाय माहिती उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आपल्या गावची पाणीपातळी किती आहे, याची माहिती दरमहा उपलब्ध होणार आहे. जिल्हयातील कोणत्या पाणलोट क्षेत्रात किती पाणीपातळी खोल गेली, याची माहिती दरमहा उपलब्ध झाल्यामुळे जिल्हयात पाण्याचा वापर कसा व्हावा, सिंचनासाठी किती वापर करता येणे शक्य आहे, याबाबत नियोजन करता येणार आहे. त्यानुसार पिकांची पध्दती ठरविता येईल. प्रामुख्याने प्रत्येक गावातील जलसुरक्षकाला हे काम देण्यात आले. त्यासाठी जलसुरक्षक व ग्रामसेवकांना पातळीच्या नोदींसोबत प्रशिक्षण देण्यात आले. ग्रामपंचायतकडून पाणीपातळीची निरीक्षणे गटविकास अधिकाऱ्यांकडे येणार आहेत. तालुक्यातून जिल्हा भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडून पडताळणी करून डाटा राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे. संदर्भ – पुढारी, २६ नोव्हेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
21
0
इतर लेख