AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आता गव्हानंतर साखरेच्या निर्यातीवर 1 जून पासून बंदी !
समाचारAgrostar
आता गव्हानंतर साखरेच्या निर्यातीवर 1 जून पासून बंदी !
➡️100 लाख मॅट्रिक टन साखरेची निर्यात होणार: गेल्या आठवड्यात सरकारने गहू निर्याती वर बंदी घातली होती. गहू निर्यातीवर बंदि घालण्यामागील हेतू म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर गव्हाचे भाव नियंत्रित राहण्यासाठी ही योजना केली होती. गव्हाची निर्यात बंदी करून सुद्धा गव्हाचे भाव हे वाढतच राहिले.गव्हाच्या निर्याती नंतर केंद्र सरकार ने अजून एक महत्वाचा निर्णय घेतला आहे तो म्हणजे साखरेची निर्यात बंदी सुद्धा केली आहे. येत्या जून च्या 1 तारखेपासून ही बंदी घातली जाणार आहे. केंद्रीय खाद्य आणि सार्वजनिक मंत्रालयाने ही माहिती सांगितली आहे. 100 लाख मॅट्रिक टन साखरेची निर्यात होणार असल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. या निर्यातीमागे एकच धोरण आहे ते म्हणजे साखरेचे भाव नियंत्रणात ठेवणे आणि महागाई कमी करणे एवढाच आहे. ➡️90 लाख टन साखर निर्यातीचा अंदाज:- 1 जून पासून कच्च्या आणि पांढऱ्या साखरेच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी घातली जाणार आहे. परंतु CXL आणि TRQ अंतर्गत युरोपियन संघ आणि अमेरिका या देशाला साखरेची निर्यात होणार असल्याचे सांगितले आहे.जगात साखर उत्पादन क्षेत्रात ब्राझील हा देश अग्रेसर आहे आणि त्यानंतर आपला भारत देश अग्रेसर आहे. भारताने चालू वर्ष्यात 85 लाख टन साखरेचा निर्णय घेतला आहे. तसेच मागील वर्षी 71.91 लाख टन साखरेची निर्यात केली होती. ➡️100 लाख मॅट्रिक टन साखर निर्यातीला परवानगी:- यंदा च्या वर्षी साखरेवर निर्यात बंदी घातल्यामुळे फक्त 100 लाख मॅट्रिक टन साखर निर्यात करू शकतो ते सुद्धा अमेरिकन संघ आणि अमेरिका देशात ही निर्यातबंदी 1 जून पासून लागू करण्यात येणार आहे ➡️संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
1
इतर लेख