AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आता एका वर्षात मिळणार १५ सिलेंडर !
समाचारAgrostar
आता एका वर्षात मिळणार १५ सिलेंडर !
➡️घरगुती एलपीजी गॅस ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली असून आता ग्राहकांना गॅस सिलेंडरसाठी रेशनिंग प्रक्रियेला सामोरे जावे लागणार असून नवीन नियमानुसार आता एका कनेक्शनसाठी वर्षभरात केवळ पंधरा सिलेंडर मिळणार आहेत. आता ग्राहकांना पंधरापेक्षा जास्त सिलेंडर एका वर्षात दिले जाणार नाहीत व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एका महिन्याचा कोटा देखील आता मर्यादित करण्यात आला असून एका महिन्यात दोन पेक्षा जास्त सिलेंडर कोणत्याही ग्राहकाला मिळणार नाहीत. ➡️जे ग्राहक विनाअनुदानित कनेक्शन वापरतात असे ग्राहक केव्हाही आणि वर्षभरात कितीही सिलेंडर घेऊ शकत होते परंतु आता या नवीन नियमानुसार फक्त पंधरा सिलिंडर ग्राहकांना मिळणार आहेत. याबाबत वितरकांनी दिलेली माहिती अशी आहे की सिलेंडर संदर्भातील रेशनिंगसाठीच्या सॉफ्टवेअर मध्ये बदल करण्यात आला असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्‍यात आली आहे. अनुदानित जे काही घरगुती गॅस आहे त्यांचे रिफील हे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या रिफीलच्या तुलनेमध्ये महाग असल्याने अनेकदा व्यावसायिक वापरासाठी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केला जात होता व या संबंधीच्याअनेक तक्रारी समोर येत असल्याने आता घरगुती एलपीजी सिलिंडरवर मर्यादा आणण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. ➡️12 अनुदानित सिलेंडर मिळणार : तेल कंपन्यांकडून ग्राहकांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला असून अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरसाठी नोंदणी केलेल्यांना वर्षभरात 12 सिलिंडर मिळणार असून या पेक्षा जास्त सिलेंडर ची आवश्यकता भासल्यास अनुदान नसलेल्या सिलिंडर ग्राहकांना घ्यावे लागणार आहे. ➡️वर्षाकाठी मिळणार पंधरा सिलेंडर : या रेशनिंग अंतर्गत एका कनेक्शनवर एका महिन्यात दोन सिलिंडर तर एका वर्षात पंधरापेक्षा जास्त सिलेंडर मिळणार नाहीत. ➡️संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
2
इतर लेख