कृषी वार्तापुढारी
आता, अफगाणी कांदा भारतात!
नवी दिल्ली – कांदयाचा वाढता दर सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. परंतु आता अफगाणिस्तानने मैत्री निभावत भारतास कांदा पुरवायला सुरूवात केली आहे. पंजाबच्या विविध शहरांत गेल्या काही दिवसांपासून अफगाणी कांदा विकण्यास सुरूवातही झाली आहे. विशेष म्हणजे अफगाणिस्तानहून पाकिस्तानमार्गेच देशात कांदा आयात होत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानहून आणखी 30 ते 35 गाडया कांदा देशात येणार आहे. भारतात कांदयाच्या दरात मोठी वाढ झाल्याने अफगाणिस्तान व्यापारी येथील बाजारात कांदा विक्रीसाठी इच्छुक आहेत. अमृतसर व लुधियानामध्ये अफगाणी कांदा 30 ते 35 रू. प्रति किलो विकला जात असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. भारतात पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानहून कांदा येण्याबाबत विचारले असता, कस्टम विभागातील एका अधिकाऱ्याने अफगाणिस्तानहून माल येण्यास कोणतीही बंदी नसल्याचे सांगितले. कांदयाचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्रीय मंत्री रामविसाल पासवान यांनी सांगितले की, कांदयाच्या गैरव्यवहार प्रकरणी व नफेखोरीविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. संदर्भ – पुढारी, 28 सप्टेंबर s2019 जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
545
0
इतर लेख