समाचारAgrostar
आजपासून लागू होणार महत्त्वाचे नियम!
☑️आजपासून ऑगस्ट महिन्याला सुरुवात होत आहे. प्रत्येक महिन्याच्या एका तारखेला अनेक नियम बदलेले जातात. अशा परिस्थितीत ऑगस्ट महिन्यातही अनेक नियमांमध्ये बदल होऊ शकतात. ज्याचा थेट परिणाम सामान्य माणसावर म्हणजेच तुमच्या खिशावर होईल.
☑️चला तर मग जाणून घेऊया 1 ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार आहेत…
☑️एलपीजीच्या किमती बदलू शकतात: एलपीजीच्या किमती सरकार दर महिन्याच्या सुरुवातीला ठरवते. सरकारी तेल कंपन्या एलपीजी सिलिंडर तसेच व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत बदल करू शकतात. या कंपन्या दर महिन्याच्या १ आणि १६ तारखेला एलपीजीची किंमत बदलतात. याशिवाय पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) चे दरही बदलू शकतात.
☑️ऑगस्टमध्ये १४ दिवस बँका बंद राहणार: या महिन्यात अनेक सण येत आहेत. ऑगस्ट महिन्यात बँकांना सुट्या असतात. रक्षाबंधन, मोहरम आणि इतर अनेक सणांमुळे विविध राज्यांमध्ये एकूण १४ दिवस बँका बंद राहणार आहेत. याबरोबरच शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश करण्यात आला आहे. तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन बँकेच्या सुट्ट्यांची यादी तपासू शकता.
☑️आयटीआरसाठी दंड भरावा लागणार : आर्थिक वर्ष २०२२-२३ म्हणजेच मूल्यांकन वर्ष २०२३-२४ साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२३ होती. या तारखेपर्यंत तुम्ही आयटीआर दाखल केला नसेल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. उशिरा आयटीआर फायलिंगसाठी करदात्यांना १००० रुपये किंवा ५००० रुपये दंड भरावा लागू शकतो.
☑️जीएसटीसाठी इलेक्ट्रॉनिक पावत्या द्याव्या लागणार : ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यवसायांना १ ऑगस्टपासून इलेक्ट्रॉनिक पावत्या (Electronic Invoice) द्याव्या लागणार आहेत.
☑️वाहतूक नियमांमध्ये मोठे बदल होणार : 1 जुलैपासून ड्रायव्हिंग लायसन्स आणि इन्शुरन्सशिवाय वाहन चालवणाऱ्यांना प्रत्येकी 5,000 रुपये दंड भरावा लागणार आहे. दुसरीकडे दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना दंडासह 6 महिने तुरुंगवासही भोगावा लागतो.
☑️स्टेट बँक ऑफ इंडिया च्या योजनेत बदल : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या अमृत कलश योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2023 आहे. तुम्हालाही अशी गुंतवणूक करायची असेल तर हे काम वेळेआधी करा.
☑️संदर्भ: Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.