AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आजपासून ‘पूर्वमोसमी’ची शक्यता!
कृषी वार्ताअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आजपासून ‘पूर्वमोसमी’ची शक्यता!
👉 विदर्भ ते केरळदरम्यान कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात उन्हाच्या चटक्यासह पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. आजपासून पुन्हा तुरळक ठिकाणी वादळ, विजांच्या कडकडाट व गारपिटीसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 👉 मे महिना सुरू झाल्याने पूर्वमोसमी पाऊस, उन्हाचा चटका, ढगाळ वातावरण अशी काहीशी स्थिती राज्यात राहणार आहे. दोन दिवसांपासून सकाळपासून वाढत असलेला पारा दुपारी सरासरी ओलांडत आहे. दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ हवामानाची स्थिती होत आहे. 👉 काही ठिकाणी ढग जमा होऊन मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. त्यामुळे हवेत काहीसा गारवा तयार होत असला तरी उकाड्यात मात्र वाढ होताना दिसून येते. बुधवारी सकाळी चोवीस तासांत विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक ४१.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. तर महाबळेश्वर येथे १८.३ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. तुरळक ठिकाणी हलक्या सरी राज्यातील बहुतांशी भागात पूर्वमोसमीचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा तीव्र होत आहेत. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, पुणे, नगर, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यांत उन्हाचा चटका वाढत आहे. मंगळवारी दुपारनंतर नाशिकमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या होत्या. तर बुधवारी काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण होते. बार्शीमध्ये दुपारी तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली होती. या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता गुरुवार➡️ सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, संपूर्ण विदर्भ शुक्रवार ➡️ संपूर्ण महाराष्ट्र शनिवार ➡️ संपूर्ण महाराष्ट्र रविवार ➡️ संपूर्ण महाराष्ट्र यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ - अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
61
12
इतर लेख