योजना व अनुदानtarunbharat
आजच सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घ्या!
➡️ सुकन्या समृद्धी योजनेचा सातवा वर्धापन दिन भारतीय डाक विभाग येत्या २४ जानेवारीला साजरा केला. पोस्ट विभाग मुलीच्या उच्च शिक्षणासाठी व तिच्या विवाहासाठी तसेच महिला सक्षमीकरण करणे या उद्देशाने भारत सरकारने सुकन्यासमृद्धी योजना सुरू केली आहे.
➡️ मुलीच्या उज्वल भविष्यासाठी राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून १० वर्षाखालील मुलींचे उज्वल भविष्य साधण्यासाठी सुकन्या खाते काढल्यापासून १५ वर्षे दरमहा रक्कम भरल्यास २१ व्या वर्षी ७.६ टक्केप्रमाणे रक्कम मिळणार आहे.
➡️ दरमहा बचत १ हजार रुपये केल्यास एका वर्षात १२ हजार रुपये रक्कम जमा होईल.१५ वर्षात ही रक्कम १ लाख 80 हजार रुपये जमा होईल. मुलीच्या २१ व्या वर्षात ३ लाख ३० हजार ३७३ रुपये जमा होईल. २१ व्या वर्षात चालू व्याजावर मिळणारी एकूण रक्कम ५ लाख १० हजार ३७३ एवढी असणार आहे.
➡️ सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत ० ते १० वर्षाच्या आतील मुलींना लीं या योजनेचा लाभ घेता येईल. सुकन्या खाते किमान २५० रुपयामध्ये उघडता येते. हे खाते काढल्यापासून १५ वर्ष पैसे भरावे लागतात.
➡️ खाते काढण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांनी जारी केलेले मुलीचे जन्म प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यामुळे या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलींच्या लीं पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डाक विभागचे उपविभागीय अधिकारी यांनी केले आहे.
➡️ सुकन्या समृद्धी योजनेसाठी पोस्टाचा अर्ज https://drive.google.com/file/d/11tqDs7ijeuB8iBH894RBVkxWO2OU8zvW/view
संदर्भ:- tarunbharat,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.