कृषि वार्तासकाळ
आखाती देशात भारताच्या ‘या’ तांदळाला पसंती
आखाती देशांकडून ११२१ बासमती तांदळाला यंदा मोठी मागणी होत आहे. प्रामुख्याने इराण, सौदी अरब, कुवेत, युनायटेड अरब अमिराती, युरोप आणि अमेरिकेत केली जाते. मागील वर्षी भारतातून ४० टन बासमती आणि ८८.१८ लाख टन बिगर बासमती तांदळाची निर्यात भारतातून झाली होती. एकूण निर्यातीपैकी एकटया इराण देशात २५ टक्के बासमती तांदळाची निर्यात भारतातून होते. त्यांची वार्षिक खरेदी ही २४.४ टन एवढी आहे, अशी माहिती घोडवत बाठिया फूड्स कंपनीचे रोशन बाठिया यांनी दिली. इराणमध्ये प्रामुख्याने भारत व पाकिस्तानमधून बासमतीची निर्यात केली जाते. क्रूड तेलाच्या मोबदल्यात ही निर्यात होते. नुकतेच क्रुड तेलाच्या मोबदल्यात इराणने भारतातून बासमती तांदळाची मोठया प्रमाणात निर्यात केली.
उत्पादनाच्या तुलनेत मोठया प्रमाणात निर्यात झाल्याने तांदळाच्या भावात क्विंटलमागे एक हजार ते दीड हजार रू. वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसह भारतीय बाजारपेठांमध्ये आंबेमोहोर, लचकारी कोलम, सुरती कोलम या बिगर बासमतीच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल रामजानच्या कालावधीत वाढला आहे. त्या तुलनेत आवक कमी असल्याने तांदळाचे भाव गेल्या महिनाभरात वधारले आहेत. संदर्भ – सकाळ, २२ मे २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
47
0
संबंधित लेख