AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
आंब्याच्या नियमित उत्पादनासाठी पॅक्लोब्युट्राझोल अर्थात कल्टार चा वापर!
आज आपण आंब्याच्या नियमित उत्पादनासाठी पॅक्लोब्युट्राझोल अर्थात कल्टार चा वापर याविषयी प्रगतशील महिला शेतकरी 'जयश्रीताई मदने' त्यांच्या मार्गदर्शनातून जाणून घेणार आहोत. 👉 पहिल्या वर्षी झाडाला मोठ्या प्रमाणात मोहोर येऊन समाधानकारक फळधारणा होते.परंतु पुढील वर्षी मात्र या झाडावर किंवा अजिबात मोहोर येत नाही याला 'अनियमित फळधारणा' असे म्हणतात. हे चक्र साधारणता झाडाच्या वयाच्या १५ वर्षानंतर प्रकर्षाने दिसून येते. 👉 काहीवेळा झाडाचा काही भाग पहिल्या वर्षी मोहोरतो तर उर्वरित भागाला पुढील वर्षी मोहोर येतो. हासुद्धा अनियमित किंवा वर्षाआड फळधारणा होण्याचा प्रकार आहे. हा प्रकार हापूस या आंबा जातीमध्ये प्रकर्षाने आढळतो. 👉 शिफारशीप्रमाणे पॅक्लोब्युट्राझोल या संजीवकाची प्रमाणित मात्रा योग्य पद्धतीने दिल्यास आणि आंबा बागेची शिफारशीनुसार योग्य मशागत केल्यास झाडाच्या अथवा झाडाच्या आरोग्यावर कोणतेही विपरीत परिणाम होत नाही. कल्टारची मात्रा कशी ठरवावी? 👉 निवडलेल्या झाडासाठी पॅक्लोब्युट्राझोल ची प्रमाणित मात्रा ठरवताना त्या झाडाचे वयोमान विचारात न घेता विस्तारानुसार पॅक्लोब्युट्राझोल मात्रा ठरवावी. 👉 झाडाचे एकूण विस्ताराचा पूर्व-पश्चिम आणि दक्षिणोत्तर व्यास मोजून त्यावर आधारित पॅक्लोब्युट्राझोल मात्रा ठरविता येते. सामान्य 3 मिली पॅक्लोब्युट्राझोल प्रति मीटर व्यास याप्रमाणे मात्र द्यावे. 👉 पॅक्लोब्युट्राझोल ची आवश्यक मात्रा पाण्यात मिसळून ती झाडाच्या बुंध्याभोवती द्यावी. त्याकरिता झाडाच्या बुंध्याभोवती सर्वसाधारणपणे खते घालण्यासाठी मारलेल्या घेरापासून 15 से.मी. आत गोलाकार पारीच्या साह्याने लहान 6 ते 8 खड्डे करून ओतावे. कल्टार देण्याची वेळ 👉 कल्टार आंबा बागेला १५ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान द्यावे . मे मध्ये आंबा तोडणी झाल्यावर छाटणी घेतल्या नंतर जून महिन्यात आंबा बागेला नवीन पालवी येते 👉 जुलै ते ऑगस्ट दरम्यान पालवी व काडी परिपक्व झाली कि दिलेल्या कल्टार मुळे नोव्हेंबर महिन्यात नवीन पालवी वर होणारी वाढीव फूट ही थोपवली जाते, त्यामुळे पूर्वी आलेली नवीन पालवी पक्व होण्यास वाव मिळतो आणि अनुकूल हवामान नोव्हेबर-डिसेंबर मध्ये आंब्याला मोहोर येतो. कल्टार देताना काय काळजी घ्यावी 👉 कल्टार संजीवक झाडाला देत असताना जमिनीमध्ये वापसा कंडिशन असावी . कल्टार दिल्यानंतर २ दिवस तरी पाऊस झाला नाही पाहिजे . पाऊस चालू असताना झाडांना कल्टार देऊ नये . 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
10
इतर लेख