आंब्याच्या कोवळ्या पालवीवर कीडचे नियंत्रण!
सल्लागार लेखअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
आंब्याच्या कोवळ्या पालवीवर कीडचे नियंत्रण!
शेतकरी बंधुनो, आज आपण अनुभवी आणि प्रगतशील महिला शेतकरी 'जयश्री मदने' यांच्या मार्गदर्शनाद्वारे आंब्याच्या कोवळ्या पालवीवर येणारी महत्वाची कीड विषयी माहिती व नियंत्रण कसे करावे हे खालील लेखच्या द्वारे जाणून घेणार आहोत. आंब्याच्या कोवळ्या पालवीवर येणारी महत्वाची कीड 👉 आंब्याच्या कोवळ्या पालवीवर प्रामुख्याने तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव होऊन कोवळ्या पालवीचे अतोनात नुकसान होत असते. म्हणूनच या किडीचा बंदोबस्त करून कोवळ्या पालवीचे संरक्षण करणे महत्वाचे आहे. तुडतुडे 👉 आंबा उत्पादनमध्ये पालवीवर येणारे तुडतुडे ही महत्वाची समस्या आहे आंबा पिकाचे सर्वात जास्त नुकसान करणारी हि कीड आहे . 👉 हे तुडतुडे कोवळ्या पालवीच्या मध्य शिरांमध्ये अंडी घालतात .साधारण ३ ते ५ दिवसांनी अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात. 👉 गव्हाच्या आकारासारखे छोटे छोटे किडे असतात.जेव्हा हि कीड पानाच्या दांड्यात अंडी घालते तिथे पान वेडीवाकडी होतात . 👉 तुडतुडे कोवळया पानावरील रस शोषून घेतात अंगावटे चिकट द्रव बाहेर सोडतात त्यावर काळी बुरशी येते झाड काळे दिसते. तुडतुडयांच्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास आंब्याचे 50 टक्क्यापेक्षा जास्त नुकसान होते. नियंत्रण 👉 झाडांच्या आतील फांद्यांची विरळणी करावी. जेणेकरून सूर्यप्रकाश आतमध्ये पोहोचेल व हवा खेळती राहील. जास्त पालवी व फांद्या झाल्यास असे वातावरण तुडतुड्यांच्या वाढीस पोषक असते. पालवीवरील तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी फवारणी १) क्रूझर ( थायोमेथोक्साम २५ %)प्रमाण - ०.५ ग्रॅम / लिटर किंवा २) मेंटो - ( इमिडाक्लोरोप्रिड ७०%) प्रमाण - ०.३५ ग्रॅम / लिटर 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
36
10
इतर लेख