AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आंबा बागेत फळगळ होण्याची कारणे व उपाययोजना!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
आंबा बागेत फळगळ होण्याची कारणे व उपाययोजना!
वातावरणात दिवसेंदिवस बदल पाहायला मिळत आहे, कधी कमी-जास्त तापमान तर कधी अवकळी पाऊस यामुळे आंबा वनस्पतीची फळगळती, फळावरील रोग किंबहुना आंबा उत्पादनात घट होत असते. त्यामुळे शेतकरी बंधुनी वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. फळगळती व फळावरील येणाऱ्या समस्येची कारणे. 1. मोहर येऊन गेल्यानंतर साधरणत: मार्च-एप्रिल मध्ये आंबे यायला सुरुवात होते. सामान्यपणे याच महिन्यामध्ये वातावरणात बऱ्याच प्रमाणात पिकासाठी अनावश्यक असे बदल होतात. यात प्रामुख्याने हवा ही कोरडी व उष्ण वाहू लागते, जी सुष्क होऊन जाते व वातावरणमध्ये नमी राहत नाही, त्यामुळे पिकामधे जीवनसत्व, नायट्रोजनची कमतरता भासून फळ लागून ही त्याची पूर्णता वाढ होत नाही परिणामी त्याची गळती होते. 2. फळ लागणीच्या वेळेस झाडाला पाण्याचा पुरवठा कमी असल्यास फळ संकुचित पावतात व ही पिकण्यापूर्वीच जमिनीवर गळून पडतात. 3. बहुतांश वेळेस अपुऱ्या परागकण प्रक्रियेमुळे तसेच अतिघन बागेतील झाडामध्ये पोषण तत्वासाठी आपापसात होणाऱ्या प्रतीस्पर्धेमुळे देखील फळांची वाढ स्थगित होऊन गळती होते. 4. वनस्पतीची वाढ नियामक PGR पीजीआरची कमतरता आढळल्यास, फळांवर किडी आणि रोगाचां प्रादुर्भाव होत असतो. 5.मोहराचे संरक्षण केल्यानंतर आंब्यावर फळमाशी, पिठ्या ढेकूण, तुडतुडे, फुलकिडे यासारख्या अनेक घातक किडयाचा प्रादुर्भाव वाढतो. त्याचप्रकारे पानावर, फळावर काळी बुरशी पाहायला मिळते, ज्यामुळे आंब्याची घट झालेली दिसते. दुर्गंध, काळ्या रंगाचे टिपके व अति पिकलेली फळ यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनास मोठ्या प्रमाणात नुकसान होते. फळगळती व रोग यावरील नियंत्रणात्मक उपाययोजना- १ .उष्ण वातावरणामुळे झाडामध्ये पाण्याची कमतरता भासते म्हणून फळ धारनेच्या काळात झाडाला वेळोवेळी भरपूर प्रमाणात पाणी द्यावे. त्यामुळे फळगळती थांबते २. झाडाला पोटॅशिअम डोज योग्य दरात द्यावा व नायट्रोजनचे प्रमाण कमी ठेवावे कारण असे न केल्यास फळ गळतीला वेग मिळतो. वनस्पतीची वाढ नियामक PGR (plant growth regulator) चा आवशकतेनुसार वापर करावा. ३. तुडतुडयाच्या नियंत्रणासाठी इमिडॅक्लोप्रिड १७.८% @१०० मिली किंवा लेम्बडा सायहॅलोथ्रीन ५% इसी @१५० मिली किंवा थायोमेथॉक्झाम २५% डब्ल्यूजी घटक असलेले क्रुझर @४० ते ८० ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे फवारणी करावी. ४. लहान आंब्याच्या गळतीसाठी NAA १०-१५ PPM साधारणत ०.२ प्रती लिटर फवारणी केली तर फळगळ थांबवता येते. (0:52:34) या विद्रव्य खताचा फवारा जर दिला तर आंब्याची वाढ मोठी होते. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
8
इतर लेख